उन्हाळा
Wikipedia कडून
उन्हाळा हा भारतातील तीन मुख्य ऋतूंपैकी एक आहे. उन्हाळ्यात हवामान गरम आणि कोरडे असते. उन्हाळ्यात शाळा आणि विद्यापीठांना सुट्टी असते.
भारतात उन्हाळा फेब्रुवारी ते मे पर्यंत असतो. उन्हाळ्याच्या सुरुवातीला वसंत ऋतूमध्ये झाडांना पालवी फुटताना दिसते. महाराष्ट्रात उन्हाळ्याच्या सुरुवातीला होळी आणि रंगपंचमी हे सण साजरे केले जातात, याच वेळी कलिंगड, फणस, इत्यादी फळे पिकलेली दिसतात. उन्हाळ्याच्या शेवटी मोठ्या प्रमाणात आंबा पिकलेला दिसतो. याच काळात वळिवाचा वादळी पाऊस पडतो.
ऋतू |
---|
उन्हाळा - पावसाळा - हिवाळा |
वसंत - ग्रीष्म - वर्षा - शरद - हेमंत - शिशिर |