कांदा
Wikipedia कडून
(इंग्रजी: Onion, हिंदी: प्याज़) संपूर्ण जगभरात खाल्ली जाणारी एक भाजी. कच्च्या कांद्याला उग्र वास आणि चव असते परंतु तो शिजवला असता त्याची चव बदलून गोडसर होते. भारतातील अनेक भागात रोजच्या जेवणात शिजवलेल्या कांद्याचा उपयोग होतो. तसेच तोंडीलावणे, कोशिंबीर, चटणी यात कच्च्या कांद्याचा उपयोग होतो.