चाणक्य
Wikipedia कडून
चाणक्य उर्फ विष्णुगुप्त उर्फ कौटिल्य (कालमान: अंदाजे ई.स.पू. ३५० च्या सुमारास) हा सम्राट चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारी महामंत्री होता. जुलमी नंदा घराणेशाहीची सांगता करून सम्राट चंद्रगुप्ताला राज सिंहासनावर विराजमान करण्यास तोच कारणीभूत होता असे मानले जाते. तसेच त्यानी रचलेल्या कौटिल्य अर्थशास्त्र ग्रंथ हा भारतीय संस्कृतीतील एक दैदीप्यमान ग्रंथ मानला जातो. २५ खंड व सहा हजार श्लोक असलेला हा ग्रंथ अर्थशास्त्र व राजनीती वर लिहिलेला मानवी इतिहासातील पहिला ग्रंथ म्हणून ओळखला जातो. या ग्रंथात प्रतिपादित केलेल्या नितीस 'चाणक्य निती' वा 'दंडनिती' या रितीने ओळखण्यात येते. प्राचीन संस्कृत भाषेत फारच थोडे लिखाण गद्यात आढळते. अर्थशास्त्र हा त्यापैकी एक ग्रंथ. चाणक्याच्या लिखाणाचा परिणाम हा त्याकाळी व त्यानंतर रचलेल्या अनेक ग्रंथावर झालेला आढळतो. महत्त्वाची उदाहरणे द्यायची झाल्यास योगेश्वर याज्ञवल्क्य कृत याज्ञवल्कल्य स्मृती, वात्सायन कृत कामसूत्र. पञ्चतंत्र या प्रसिद्ध वाङमयाचा लेखक देखील आपल्या लिखाणात ततो धर्मशास्त्राणि मन्वादीनि, अर्थशास्त्राणि चाणक्यादीनि, कामशास्त्राणि वात्स्यायदीनि. या श्लोकात अर्थशास्त्राचे महत्व मान्य करतो.
[संपादन] हेही पहा
अर्थशास्त्राच्या हस्तलिखिताचा ई.स. १९०५ साली शोध लागला व डॉ. शामाशास्त्री या जगविख्यात संस्कृत भाषा तज्ञाने त्याचा ई.स. १९१५ साली इंग्रजी भाषेतील अनुवाद प्रसिद्ध केला. शामाशास्त्रींचा अनुवाद (भाष्यासह्) आज सहज उपल्ब्ध आहे. जरूर वाचावा.