भारतीय रेल्वे
Wikipedia कडून
भारतीय रेल्वे (भा. रे.) ही भारताची सरकार-नियंत्रित सार्वजनिक रेल्वे सेवा आहे. भारतीय रेल्वे जगातील सर्वात मोठ्या रेल्वेसेवांपैकी एक आहे. भारतातील रेल्वेमार्गांची एकूण लांबी ६३,१४० किलोमीटर इतकी आहे. २००३ पर्यंतच्या आकडेवारीनुसार भारतीय रेल्वे दररोज १३ लाख प्रवाशांची, तसेच १४ लाख टन मालाची वाहतूक करते.
भारतीय रेल्वे ही कर्मचारी संख्येनुसार जगातील सर्वात मोठी संघटना असून, ती १९९८ च्या आकडेवारीनुसार नुसार १६ लाख लोकांना रोजगार पुरवते.
[संपादन] इतिहास
भारतीय रेल्वेचा इतिहास १५० वर्षांपेक्षाही जास्त जुना आहे. भारतातील पहिली प्रवासी रेल्वे १६ एप्रिल १८५३ रोजी बोरीबंदर (नंतरचे व्हिक्टोरिया टर्मिनस, व आताचे छत्रपती शिवाजी टर्मिनस) ते ठाणे अशी ३४ किलोमीटर धावली.