मायक्रोसॉफ्ट विंडोज
Wikipedia कडून
विंडोज हे मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या ऑपरेटिंग सिस्टिम सॉफ्टवेअरचे नाव आहे. विंडोज ही एकच ऑपरेटिंग सिस्टिम नसून तिच्या अनेक आवृत्त्या प्रचलित आहेत.
विंडोजची सर्वात नवीन आवृत्ती 'विंडोज विस्टा' (Window Vista) ही ३० जानेवारी २००७ ला सर्वसाधारणपणे प्रसिद्ध केली गेली. सध्याच्या सर्वात जास्त वापरात असलेल्या आवृत्त्या आहेत: Windows XP, Windows 2000, Windows 98. (इतर जुन्या आवृत्त्या Windows NT व Windows 95 ह्या अतिशय नगण्य प्रमाणात वापरल्या जातात). विंडोज ९८ वगळता वरील बहुतांश आवृत्त्या ह्या 'विंडोज एन्.टी.' (Windows NT) वर आधारीत आहेत.
मायक्रोसॉफ्ट विंडोजची सुरवात मायक्रोसॉफ्टच्याच त्यापूर्वीच्या 'डॉस' (DOS) ह्या सिस्टिमला पूरक असा 'Graphical interface' म्हणून झाली. सर्वात प्रथम लोकप्रिय झालेली विंडोजची आवृत्ती (Version) 'Windows 3.1' ही होती (मात्र ही तांत्रिकदृष्ट्या ऑपरेटिंग सिस्टिम नव्हती).
विंडोज ही इंटेल आणि ए.एम.डी. कंपन्यांच्या मायक्रोप्रोसेसरर्स वर चालते. मुख्यतः इंटेल कंपनीच्या काँप्युटरर्सवर लोकप्रिय झाल्यामुळे विंडोज ऑपरेटिंग सिस्टिम व इंटेल प्रोसेसर असणारे काँप्युटर हे समीकरण 'विंटेल' (Windows + INTEL = WINTEL) म्हणून प्रसिध्द आहे.
मायक्रोसॉफ्ट विंडोज जगातील सर्वात लोकप्रिय ऑपरेटिंग सिस्टिम आहे. जगभरातील सर्व डेस्कटॉप पर्सनल काँप्युटरर्सपैकी ९०% हून अधिक काँप्युटर कोणत्यातरी एका विंडोज आवृत्तीवर चालतात.
सर्वर काँप्युटर (Server computers) साठी विंडोजच्या काही आवृत्त्या आहेत उदा. Windows Server 2003.
पी.डी.ए., मोबाईल फोन इत्यादी लहान उपकरणांमध्ये विंडोजची 'Windows CE' ही आवृत्ती वापरली जाते.