आळंदी
Wikipedia कडून
महाराष्ट्रातील प्रसिद्ध संत संत ज्ञानेश्वर यांचे आळंदी हे समाधी स्थान आहे. संत ज्ञानेश्वरांनी आपल्या जीवनातील काही काळ येथे व्यतीत केला. आळंदी हे "देवाची आळंदी" असे देखील ओळखले जाते.
आळंदी हे शहर इंद्रायणी नदीच्या तीरावर वसलेले आहे. संत ज्ञानेश्वर समाधी मंदिराच्या मागच्या बाजूला नदीवर असलेला घाट अतिशय सुंदर आहे. (चित्र पाहा.)
समाधी मंदिर अतिशय सुंदर आहे. हे मंदिर १५७० मध्ये बांधण्यात आले असे सांगितले जाते. संत ज्ञानेश्वरांनी चांगदेव भेटीस जाण्याकरता वापरलेली भिंत आपण येथे पाहू शकता.
आषाढ महिन्यातील एकादशीला आळंदीहून पंढरपूरला जाणारी ज्ञानेश्वरांची पालखी प्रसिद्ध आहे. या पालखीसोबत लाखो वारकरी अंदाजे १५० किमी अंतर पायी चालत पंढरपूरला विठोबाच्या दर्शनासाठी जातात.
[संपादन] काय बघाल?
आळंदीतील इतर प्रेक्षणीय स्थळे
- मुक्ताई मंदिर
- राम मंदिर
- कृष्ण मंदिर
- स्वामी हरिहरेंद्र मठ
- विठ्ठल रखुमाई मंदिर