जन गण मन
Wikipedia कडून
जन गण मन भारताचे राष्ट्रगीत आहे. नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी बंगालीमध्ये लिहिलेल्या कवितेतील पाच कडव्यांपैकी एक कडव्याचे हिंदीतील भाषांतराचा राष्ट्रगीत म्हणुन स्वीकार केलेला आहे.
अनुक्रमणिका |
[संपादन] बोल
जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्यविधाता पंजाब सिन्धु गुजरात मराठा द्राविड़ उत्कल बंग विन्ध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशिष मांगे गाहे तव जयगाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्यविधाता जय हे, जय हे, जय हे जय जय जय जय हे!
[संपादन] वाद
या कवितेच्या भारताचे राष्ट्रगीत होण्याच्या योग्यतेबद्दल वाद आहे. ही कविता प्रथम भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या १९११ मधील अधिवेशनात म्हटली गेली होती. रवींद्रनाथ टागोर यांनी हे भारताच्या भविष्याचे जयगीत म्हणून लिहिले होते. पुढच्याच दिवशी जॉर्ज पाचवा याचे स्वागत करण्यात आले. त्यामुळे असा समज पसरला की ते राजाला उद्देशून लिहिले आहे. पण टागोरांनी ही कविता देवाला उद्देशून लिहिली आहे असे म्हणले जाते. टागोरांच्या महान देशप्रेमाचा आणि त्यांच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रयत्नांचा विचार करता 'भाग्यविधाता' हा शब्द ब्रिटिश राजाला उद्देशून केला असणे शक्य नाही. खरेतर टागोरांच्या आयुष्यातील महत्त्वाची घटना म्हणजे ब्रिटिशांच्या अनैतिक व्यवहारांमुळे नाईट पदवीचा अस्वीकार ही आहे.
/*भाषांतर करावे*/ In a letter to Pulin Behari Sen, Tagore later wrote, "A certain high official in His Majesty's service, who was also my friend, had requested that I write a song of felicitation towards the Emperor. The request simply amazed me. It caused a great stir in my heart. In response to that great mental turmoil, I pronounced the victory in Jana Gana Mana of that Bhagya Vidhata [ed. God of Destiny] of India who has from age after age held steadfast the reins of India's chariot through rise and fall, through the straight path and the curved. That Lord of Destiny, that Reader of the Collective Mind of India, that Perennial Guide, could never be George V, George VI, or any other George. Even my official friend understood this about the song. After all, even if his admiration for the crown was excessive, he was not lacking in simple common sense."
[संपादन] हे पहा
[संपादन] बाह्य दुवे
- MIDI मध्ये भारतीय राष्ट्रगीत
- भारतीय दूतावास, लिस्बन, पोर्तुगाल येथील MP3 मध्ये भारतीय राष्ट्रगीत
- जन गण मनची उत्पत्ती
वर्ग: राष्ट्रगीते | भारत