मार्च ३
Wikipedia कडून
फेब्रुवारी – मार्च – एप्रिल | ||||||
सोम | मंगळ | बुध | गुरू | शुक्र | शनि | रवि |
२७ | २८ | २९ | १ | २ | ३ | ४ |
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ | २९ | ३० | ३१ | १ |
ई.स. २००७ ग्रेगरी दिनदर्शिका |
मार्च ३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ६१ वा किंवा लीप वर्षात ६२ वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
[संपादन] ठळक घटना
[संपादन] पहिले शतक
- ८६ - युजेनियस चौथा पोपपदी.
[संपादन] एकोणिसावे शतक
- १८४५ - फ्लोरिडा अमेरिकेचा २७वे राज्य झाले.
- १८४९ - मिनेसोटाला अमेरिकेचा प्रांत म्हणून मान्यता.
- १८५७ - फ्रांस व युनायटेड किंग्डमने चीन विरुद्ध युद्ध पुकारले.
- १८६३ - आयडाहोला अमेरिकेचा प्रांत म्हणून मान्यता.
- १८७८ - बल्गेरियाला ओट्टोमान साम्राज्यापासून स्वातंत्र्य.
[संपादन] विसावे शतक
- १९०४ - जर्मनीचा कैसर विल्हेम दुसर्याचा आवाज प्रथम मुद्रित केला गेला.
- १९१८ - पहिले महायुद्ध - ब्रेस्ट-लिटोव्स्कचा तह - युद्धातील रशियाचा सहभाग समाप्त. फिनलंड, लात्व्हिया, एस्टोनिया, पोलंड व लिथुएनियाच्या स्वतंत्र अस्तित्त्वाला मान्यता.
- १९३१ - अमेरिकेने स्टार स्पँगल्ड बॅनर या गीतास राष्ट्रगीताचा दर्जा दिला.
- १९३८ - सौदी अरेबियात खनिज तेल सापडले.
- १९३९ - गांधीजींनी मुंबईत आमरण उपोषण सुरू केले.
- १९४२ - दुसरे महायुद्ध - जपानी वायुदलाने पश्चिम ऑस्ट्रेलियातील ब्रूम गावावर बॉम्बफेक केली. १०० ठार.
- १९४३ - दुसरे महायुद्ध - लंडनमध्ये बॉम्बविरोधी आश्रयस्थानात घुसताना झालेल्या चेंगराचेंगरीत १७३ ठार.
- १९४५ - दुसरे महायुद्ध - आत्तापर्यंत तटस्थ असलेल्या फिनलंडने जर्मनी, जपान व मित्रदेशांविरुद्ध युद्ध पुकारले
- १९५३ - कॅनेडियन पॅसिफिक एरलाईन्सचे विमान पाकिस्तानच्या कराची शहराजवळ कोसळले. ११ ठार.
- १९५८ - नुरी अस सैद १४व्यांदा इराकच्या पंतप्रधानपदी.
- १९६१ - हसन दुसरा मोरोक्कोच्या राजेपदी.
- १९६६ - ब्रिटिश ओव्हरसीझ एरवेझचे बोईंग ७०७ जातीचे विमान जपानच्या माउंट फुजीवर कोसळले. १२४ ठार.
- १९७३ - भारताच्या ओरिसा राज्यात राष्ट्रपती राजवट.
- १९७४ - तुर्कस्तानचे डी.सी.१० जातीचे विमान पॅरिसजवळ कोसळले. ३४६ ठार.
- १९९१ - लॉस एन्जेल्सच्या पोलिसांचे रॉडनी किंग नावाच्या टॅक्सीचालकाला चोप देतानाचे चित्रीकरण केले गेले.
- १९९५ - सोमालियातून संयुक्त राष्ट्रांचे शांतिदल बाहेर पडले.
[संपादन] एकविसावे शतक
[संपादन] जन्म
- १४५५ - जॉन दुसरा, पोर्तुगालचा राजा.
- १८३९ - जमशेटजी टाटा, भारतीय उद्योगपती.
- १८४७ - अलेक्झांडर ग्रॅहाम बेल, स्कॉटिश संशोधक.
- १९३० - इयोन इलेस्कु, रोमेनियाचा राष्ट्राध्यक्ष.
[संपादन] मृत्यू
- ५६१ - पोप पेलाजियस पहिला.
- १७०७ - औरंगझेब, मोगल सम्राट.
- १९३७ - आमेलिया इअरहार्ट, अमेरिकन वैमानिक (बेपत्ता).
- १९४३ - जॉर्ज थॉम्पसन, इंग्लिश क्रिकेटपटू.
[संपादन] प्रतिवार्षीक पालन
मार्च १ - मार्च २ - मार्च ३ - मार्च ४ - मार्च ५ - (मार्च महिना)