राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
Wikipedia कडून
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्त्वाच्या तत्वावर आधारलेली एक हिंदू राष्ट्रवादी संस्था आहे. ही ई.स. १९२५ मध्ये डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार यांनी चालू केली. बी.बी.सी. अनुसार ती जगातील सर्वात मोठी स्वयंसेवी संस्था आहे. १९२५ पासुन हळूहळू संघाला महत्व प्राप्त होत गेले आणि शेवटी त्यातून भारतीय जनसंघ या पक्षाचा उदय झाला जो नंतर भारतीय जनता पक्ष बनला. याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा राजकीय शाखा समजले जाते/जात होते.
अनुक्रमणिका |
[संपादन] संरचना
संघ विविध शाखांच्या स्वरुपात उभारला आहे. सरसंघचालक त्याचे दिग्दर्शक आहेत. ही जागा नियुक्तिने भरली जाते. जुने सरसंघचालक आपला उत्तराधिकारी निवडतात. संघाच्या शाखा दररोज सकाळी १ -२ तास सार्वजनिक ठिकाणी भरतात. सध्या साधारणत: २५,००० शाखा संपुर्ण भारतात चालतात. शाखा संघाच्या बांधणीतील मुळ पाया आहेत. शाखांमध्ये योग, कसरतीचे खेळ, बौद्धिके ( ज्यात विविध सामाजिक विषय हाताळले जातात), भारतमातेची प्रार्थना इत्यादी गोष्टी केल्या जातात. बहुधा शैक्षणिक सभेमध्ये भारताचा इतिहास, भारतीय तत्त्वज्ञान , संस्कृती इत्यादि विषय हाताळले जातात.
[संपादन] संघाची उपलब्धी
संघाने समाजातील विविध स्तरात आपले अस्तित्व तयार केले आहे. उदाहरणार्थ १९६२ च्या भारत-चीन युद्धामध्ये पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू इतके प्रभावीत झाले की त्यांनी संघातील स्वयंसेवकांना जानेवारी २६, १९६३ च्या प्रजासत्ताक दिनाच्या मिरवणुकीला संघाला निमंत्रण दिले. २ दिवसांच्या सुचनेनंतर ३००० पेक्षा जास्त स्वयंसेवक संघाच्या मिरवणुकीला हजर राहिले. अलीकडील काळात संघातील विचारसरणीने तयार झालेल्या लोकांनी उच्च राजकिय पदे मिळवलेली दिसतात. उदाहरणार्थ भैरव सिंग शेखावत(उपराष्ट्रपती), अटल बिहारी वाजपेयी(पंतप्रधान), लाल कृष्ण अडवाणी(गृहमंत्री) इत्यादी.
[संपादन] टीका
इ.स. १९४८ मध्ये संघावर गांधीहत्या प्रकरणामुळे बंदी घालण्यात आली. महात्मा गांधींचा खुनी नथुराम गोडसे हा संघाचा जुना स्वयंसेवक असल्यामुळे असे करण्यात आले. पण झालेल्या तपासणीत संघ निर्दोष असल्याचे सिद्ध झाले व बंदी उठवण्यात आली.
काही टीकाकार संघाच्या विचारसरणीवर हिंदू हुकूमशाही म्हणून टीका करतात. तर संघाच्या समर्थकांची मुख्य मागणी सरकारने अल्पसंख्यकांचे लाड थांबवावेत अशी आहे उदाहरणार्थ: हिंदू मंदिरे सरकारच्या ताब्यात पण मशिदींवर आणि चर्चवर कोणतीही बंधने नाहीत, शाह बानो खटल्याची हाताळणी, कलम ३७० ज्यात कोणत्याही भारतीय नागरिकाला काश्मिरमध्ये वसण्यावर असलेली बंदी,समान नागरी कायदा , हाज यात्रेला दिलेली सूट आणि लोकसंख्या नियंत्रण कार्यक्रम मुस्लिम मतदार दुखावतील म्हणून न चालवणे इत्यादी. टीकाकार असे म्हणतात की हे मुद्दे मुस्लिम द्वेष पसरवतात आणि हिंदू अनुकूल गोष्टी विसरतात जसे की हिंदू कुटुंबांना मिळणारी करामधील सूट, हिंदू यात्रांना मिळणारी अर्थिक मदत इत्यादी.
संघाची ऐतहासिक भूमिका अशी आहे की हिंदुंवर त्यांच्याच भूमीवर अन्याय होत आला आहे आणि संघ केवळ हिंदूंच्या नैसर्गिक हक्कांची मागणी करत आहे. टीकाकार म्हणतात की संघ भारताचा निधर्मवादी पाया बदलू पाहतो आहे. याशी संबंधित महत्वाचा मुद्दा म्हणजे बाबरी मशिदीचा आहे. काही हिंदू लोक असे म्हणत होते की बाबराने मशिद बांधण्याआधी त्याठिकाणचे मंदिर तोडले व ती जागा रामजन्मभूमी होती. तर टीकाकार असे म्हणतात की संघ केवळ वाद तयार करू पाहतोय कारण अयोध्येत अशी बरीच मंदिरे आहेत जी रामजन्मभूमी म्हणून ओळखली जातात. इ.स. २००३ मध्ये भारतीय पुरातत्व विभागाने केलेल्या विवादास्पद अभ्यासात असे निष्पन्न झाले की मशिदीच्या ठिकाणी पूर्वी मंदिरासारखी इमारत होती.
[संपादन] संघ प्रेरणेतून तयार झालेल्या संस्था
- भारतीय जनसंघ
- भारतीय जनता पक्ष (पूर्वीचा भारतीय जनसंघ)
- भारतीय मजदूर संघ
- सेवा भारती
- विद्या भारती
- स्वदेशी जागरण मंच
- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद
- हिंदू स्वयंसेवक संघ
- विश्व हिंदू परिषद
- वनवासी कल्याण आश्रम
[संपादन] आजवरचे सरसंघचालक
- डाँ. केशव बळीराम हेडगेवार
- माधव सदाशिव गोळवलकर गुरूजी
- मधुकर दत्तात्रेय देवरस (बाळासाहेब देवरस)
- प्रा. राजेंद्रसिंहजी (रज्जुभैय्या)
- कृप. सी. सुदर्शन
[संपादन] हे पहा
- हिंदुत्व
- विश्व हिंदू परिषद
- बजरंग दल
- भारतीय जनता पक्ष
- राष्ट्रवाद
- ऑर्गनायझर (संघाचे आंग्लभाषीय मुखपत्र)
- पांचजन्य (संघाचे राष्ट्रभाषीय (हिंदी) मुखपत्र)
[संपादन] बाह्य दुवे
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अधिकृत संकेतस्थळ
- अटल बिहारी वाजपेयींचे "संघ माझा प्राण"
- संघाची ध्येयदृष्टी
- संघाचे पराक्रम
- संघ आणि अल्पसंख्यांक
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एक निबंध
- संघ आणि हिंदू आतंकवाद
- डॉ. कोएंराड एल्स्ट यांच्या हिंदू राष्ट्रवादावरील पुस्तकतील एक प्रकरण
[संपादन] संघ प्रेरणेतुन तयार झालेल्या संस्था
- सेवा भारती
- विद्या भारती
- स्वदेशी जागरण मंच
- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद
- हिंदू स्वयंसेवक संघ
- विश्व हिंदू परिषद
- भारत विकास परिषद
- एकल विद्या