रोम
Wikipedia कडून
रोम ही इटलीची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे.
तिबेर व ऍनियेन नद्यांच्या संगमावर वसलेल्या या शहराला अतिप्राचीन इतिहास आहे. ई.स.पू. ८व्या शतकापासूनच्या लिखित इतिहासात रोमचा उल्लेख आहे.
एका नोंदीनुसार रोमची स्थापना एप्रिल २१, ई.स.पू. ७५३ रोजी करण्यात आली होती.
रोमची लोकसंख्या २५,५३,८७३ (२००४चा अंदाज) आहे. व्हॅटिकन सिटी हे कॅथोलिक ख्रिश्चन धर्माचे मुख्य केंद्र व स्वतंत्र राष्ट्र रोममध्ये आहे.