वन्दे मातरम्
Wikipedia कडून
वन्दे मातरम् या गीताला भारतीय संविधानानुसार राष्ट्रगान हा दर्जा मिळालेला आहे. बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी इ.स. १८८२ मध्ये प्रकाशित केलेल्या त्यांच्या आनंदमठ या कादंबरीमध्ये हे गीत लिहिले होते आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्यासाठी प्रेरणागीत बनले.
गीतकार: बंकिमचंद्र चॅटर्जी
रचना वर्ष: ई.स. १८७६
प्रकाशन वर्ष: ई.स. १८८२
वन्दे मातरम्
वन्दे मातरम्
सुजलाम् सुफलाम् मलयजशीतलाम्
सस्यश्यामलाम् मातरम्।
शुभ्रज्योत्स्नापुलकितयामिनीम्
फुल्लकुसुमितद्रुमदलशोभिनीम्
सुहासिनीम् सुमधुर भाषिणीम्
सुखदाम् वरदाम् मातरम् ॥ १ ॥
वन्दे मातरम् ।
कोटि - कोटि - कण्ठ कल - कल - निनाद - कराले,
कोटि - कोटि - भुजैर्धृत - खरकरवाले,
अबला केन मा एत बले।
बहुबलधारिणीम् नमामि तारिणीम्
रिपुदलवारिणीम् मातरम् ॥ २ ॥
वन्दे मातरम् ।
तुमि विद्या, तुमि धर्म
तुमि हृदि, तुमि मर्म
त्वं हि प्राणाः शरीरे
बाहुते तुमि मा शक्ति,
हृदये तुमि मा भक्ति,
तोमारइ प्रतिमा गडि मन्दिरे-मन्दिरे ॥ ३ ॥
मातरम् वन्दे मातरम् ।
त्वम् हि दुर्गा दशप्रहरणधारिणी
कमला कमलदलविहारिणी
वाणी विद्यादायिनी,
नमामि त्वाम् नमामि कमलाम्
अमलाम् अतुलाम् सुजलाम् सुफलाम् मातरम् ॥ ४ ॥
वन्दे मातरम् ।
श्यामलाम् सरलाम् सुस्मिताम् भूषिताम्
धरणीम् भरणीम् मातरम् ॥ ५ ॥
वन्दे मातरम् ।
-बंकीमचंद्र चट्टोपाध्याय (चटर्जी)
===
'आनंदमठ' लिहिण्यापूर्वी पाच वर्षे, कार्तिक शु. ९, १७ नोव्हेंबर १८७५ रोजी बंकीमचंद्र चटर्जींनी लिहिलेले हे गीत जणू 'आनंदमठ' कादंबरीसाठीच लिहिले असावे इतके चपखल बसले आहे.
===
संदर्भ-
"आनंदमठ - आक्षेप आणि खंडन"
लेखक - मिलिंद प्रभाकर सबनीस
प्रकाशक - जन्मदा प्रतिष्ठान
प्रकाशन - २६ जानेवारी २००६
आई तुला प्रणाम
आई तुला प्रणाम ॥ धृ ॥
सुजल तू, सुफल तू, मलयानिलशीत तू ।
हरीतशस्यावृत्त तू ॥
चांद्रज्योत्सनापुलकित यामिनी ।
उदितपुष्प-लता-वनांनी विभूषिते ॥
सुहासिनी, सुमधूर भाषिणी ।
सुखदा, वरदायिनी ॥ १ ॥ आई, तुला प्रणाम
कोटी कोटी मुखांनी अभिव्यक्त तू ।
कोटी कोटी बाहूंचे बल प्राप्त तू ॥
अबला कशी? महाशक्ती तू ।
अतुलबलधारिणी ॥
प्रणितो तुज तारिणी ।
शत्रुदलसंहारिणी, तुला प्रणाम ॥ २ ॥ आई, तुला प्रणाम
तू विद्या, तू धर्म ।
तू हृदय, तू मर्म ॥
तूच प्राण अन् कुडीही ।
तूच मम बाहूशक्ती ॥
तूची अंतरीची भक्ती ।
तुझीच प्रतिमा वसे, हर मंदिरी, मंदिरी ॥
तुला प्रणाम ।
आई तुला प्रणाम ॥ ३ ॥ आई, तुला प्रणाम
तू ची दुर्गा, दशप्रहरणधारिणी ।
कमला, कमलदल विहारिणी ॥
वाणी, विद्यादायिनी ।
तुला प्रणाम, कमले तुला प्रणाम ॥
अमले, अतुले, सुजले, सुफले, आई ।
आई तुला प्रणाम ॥
श्यामले, सरले, सुस्मिते, भूषिते ।
तूच घडवी, पोषी तू, आई ॥ ४ ॥ आई तुला प्रणाम
===
मराठी रुपांतर - श्री. नरेंद्र गोळे
दिनांक - ८ ऑगस्ट २००६