शिवनेरी
Wikipedia कडून
शिवनेरीचा प्राचीन कालीन किल्ला महाराष्ट्र राज्यात जुन्नर गावाजवळ, पुण्यापासून अंदाजे १०५ कि.मी. वर आहे. शिवनेरी हे छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे जन्मस्थान आहे.
या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून जिंकावयास कठीण असा बालेकिल्ला आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व जिजाबाई व बाल-शिवाजी यांच्या प्रतिमा आहेत.