Wikipedia कडून
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन] जानेवारी-जून
[संपादन] जुलै-डिसेंबर
- जुलै ३ - व्लादिवोस्तोकिया एरलाईन्सचे टी.यु.१५४ प्रकारचे विमान इर्कुट्स्क येथे कोसळले. १४५ ठार.
- जुलै १८ - अमेरिकेच्या बाल्टिमोर शहरातील बोगद्यात रेल्वे गाडी रुळांवरुन घसरली व पेटली. शहराचा मध्यवर्ती भाग बंद करावा लागला.
- जुलै २४ - सिमिओन सॅक्स-कोबर्ग-गोथा बल्गेरियाच्या पंतप्रधानपदी.
- जुलै २८ - अलेहांद्रो टोलेडो पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- ऑगस्ट ९ - इस्रायेलची राजधानी जेरुसलेममध्ये दहशतवाद्यांच्या बॉम्बहल्ल्यात १५ ठार व १३० जखमी.
- डिसेंबर १३ - पाकिस्तानी अतिरेक्यांनी भारताच्या संसदेवर हल्ला केला. पाचही अतिरेकी व सुरक्षा कर्मचार्यांसह ८ अन्य व्यक्ती ठार.
- डिसेंबर २१ - देशावरील आर्थिक संकट आणी शहरांमधील दंगलींना जबाबदार ठरवून आर्जेन्टिनाच्या अध्यक्ष फर्नान्डो दे ला रुआची हकालपट्टी.
- डिसेंबर २२ - काबुल, अफगाणिस्तानमध्ये बुरहानुद्दीन रब्बानीने सत्तेची सूत्रे हमीद करझाईला दिली.
- डिसेंबर २२ - रिचार्ड रीड, शू बॉम्बरने अमेरिकन एरलाईन्स फ्लाईट ६३मध्ये आपल्या बुटात लपविलेली स्फोटके उडविण्याचा प्रयत्न केला.
- डिसेंबर २९ - पेरूची राजधानी लिमाच्या ऐतिहासिक मध्यवर्ती भागात आग. २७४ ठार.
- डिसेंबर ३० - आर्जेन्टिनात ब्युएनोस एर्सच्या रिपब्लिका क्रोमेन्योन नाईटक्लबमध्ये आग. १९४ ठार.
- जानेवारी ३ - सुशीला नायर, भारतीय आरोग्यमंत्री.
- जानेवारी १६ - पंडितराव बोरस्ते, भारतीय क्रीडा संघटक, शिवछत्रपती पुरस्कार विजेता.
- मे २ - मोहनलाल पिरामल, भारतीय उद्योगपती.
- मे २५ - नीला घाणेकर, गायिका.
- जून २२ - डॉ. अरुण घोष, भारतीय अर्थतज्ञ.
- जून २६ - वसंत पुरुषोत्तम काळे, मराठी साहित्यिक.
- ऑगस्ट २८ - व्यंकटेश माडगूळकर, मराठी लेखक, चित्रकार, शिकारी, पटकथाकार.
- सप्टेंबर २९ - न्विन व्हान थ्यु, दक्षिण व्हियेतनामचा राष्ट्राध्यक्ष.
- ऑक्टोबर ५ - थॉमस वॉटरफील्ड, ब्रिटिश-भारतीय साहित्यिक.
- डिसेंबर २९ - हर्षद महेता, भारतीय शेरदलाल.
ई.स. १९९९ - ई.स. २००० - ई.स. २००१ - ई.स. २००२ - ई.स. २००३