फेब्रुवारी १४
Wikipedia कडून
जानेवारी – फेब्रुवारी – मार्च | ||||||
सोम | मंगळ | बुध | गुरू | शुक्र | शनि | रवि |
२९ | ३० | ३१ | १ | २ | ३ | ४ |
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ | (२९) १ |
२ | ३ | ५ |
ई.स. २००७ ग्रेगरी दिनदर्शिका |
फेब्रुवारी १४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ४५ वा किंवा लीप वर्षात ४५ वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
[संपादन] ठळक घटना
[संपादन] नववे शतक
- ८४२ - टकल्या चार्ल्स व जर्मन लुइसने तह केला.
[संपादन] अकरावे शतक
- १०१४ - पोप बॉनिफेस पहिल्याने बव्हारियाच्या हेन्रीला जर्मनीचा राजा म्हणून मान्यता दिली.
- १०७६ - पोप ग्रेगोरी सातव्याने पवित्र रोमन सम्राट हेन्री चौथ्याला वाळीत टाकले.
[संपादन] अठरावे शतक
- १७४३ - हेन्री पेल्हाम ईंग्लंडच्या पंतप्रधानपदी.
- १७७९ - जेम्स कूक सँडविच आयलंड(हवाई)च्या रहिवाश्यांकडून मारला गेला.
[संपादन] एकोणिसावे शतक
- १८०३ - अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायाधीश जॉन मार्शलने जाहीर केले की अमेरिकन संविधानाच्या विरुद्ध असलेला कुठलाही कायदा लागू करता येणार नाही.
- १८०४ - सर्बियात ऑट्टोमन साम्राज्याविरूद्ध उठाव.
- १८५९ - ओरेगोन अमेरिकेचे ३३वे राज्य झाले.
- १८७६ - अलेक्झांडर ग्रॅहाम बेल व एलिशा ग्रेने एकाच दिवशी दूरभाष यंत्रणेच्या पेटंटसाठी अर्ज केला.
- १८७९ - चिलीने बॉलिव्हियाच्या अँटोफागस्टा शहरावर हल्ला केला. दोन्ही देशात युद्ध सुरू.
- १८९९ - अमेरिकेत निवडणुक यंत्र वापरण्यास सुरूवात.
[संपादन] विसावे शतक
- १९०० - दक्षिण आफ्रिकेत दुसरे बोअर युद्ध सुरू.
- १९१२ - ऍरिझोना अमेरिकेचे ४८वे राज्य झाले.
- १९१२ - ग्रोटोन, कनेक्टिकट येथे पहिली डीझेल पाणबुडी तयार झाली.
- १९१८ - एडगर राइस बरोच्या टारझनवरील पहिला सिनेमा प्रदर्शित झाला.
- १९१९ - रशिया व पोलंडमध्ये युद्ध सुरू.
- १९२४ - संगणक तयार करणारी कंपनी आय.बी.एमची स्थापना.
- १९२९ - शिकागोत माफिया ऍल कपोनच्या गुंडांनी विरुद्ध टोळीतील सात गुंडांना गोळ्या घातल्या.
- १९४३ - दुसरे महायुद्ध - रोस्तोव, रशियाला रशियन सैन्याने जर्मन वेढ्यातुन मुक्त केले.
- १९४३ - दुसरे महायुद्ध - कॅसेरिन पासची लढाई - ट्युनिसीयात फील्ड मार्शल अर्विन रोमेलच्या आफ्रिका कोरने कॅसेरिन घाटातील दोस्त राष्ट्रांच्या सैन्यावर कडाडून हल्ला चढवला.
- १९४४ - दुसरे महायुद्ध - जावात जपानी सैन्याविरुद्ध उठाव.
- १९४५ - दुसरे महायुद्ध - रॉयल एर फोर्सने जर्मनीच्या ड्रेस्डेन शहरावर तुफानी बॉम्बफेक केली व शहर बेचिराख केले.
- १९४५ - चिली, इक्वेडोर, पेराग्वे व पेरू संयुक्त राष्ट्रात दाखल.
- १९४५ - अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डिलानो रूझवेल्ट व सौदी अरेबियाचा राजा इब्न सौद यांच्यात बैठक. अमेरिका व सौदी अरेबियात राजकीय संबंध सुरू.
- १९४६ - बँक ऑफ ईंग्लंडचे राष्ट्रीयकरण.
- १९४६ - पहिला संगणक एनियाक युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनियात प्रदर्शित करण्यात आला.
- १९४९ - इस्रायेलच्या संसदेची (क्नेसेट) पहिली बैठक सुरू.
- १९५२ - नॉर्वेची राजधानी ऑस्लो येथे सहावे हिवाळी ऑलिंपिक खेळ सुरू.
- १९६१ - १०३ क्रमांकाचा मूलभूत पदार्थ, लॉरेन्सियमची प्रथमतः निर्मिती.
- १९६६ - ऑस्ट्रेलियन डॉलरचे दशमान पद्धतीत रूपांतर.
- १९८० - अमेरिकेत लेक प्लॅसिड येथे तेरावे हिवाळी ऑलिंपिक खेळ सुरू.
- १९८१ - आयर्लंडची राजधानी डब्लिन येथील नाइट क्लबला लागलेल्या आगीत ४८ ठार.
- १९८९ - भोपाळ दुर्घटना - युनियन कार्बाइडने भारत सरकारला ४७,००,००,००० अमेरिकन डॉलर नुकसान भरपाई देण्याचे कबूल केले.
- १९८९ - ईराणच्या आयातोल्ला खोमेनीने ब्रिटीश लेखक सलमान रश्दीच्या खूनाचा फतवा काढला.
[संपादन] एकविसावे शतक
- २००५ - लेबेनॉनच्या भूतपूर्व पंतप्रधान रफिक हरिरिचा हत्या.
[संपादन] जन्म
- १४८३ - बाबर, मोगल सम्राट.
- १९१३ - जिमी हॉफा, अमेरिकन कामगार नेता.
- १९४२ - मायकेल ब्लूमबर्ग, न्यूयॉर्कचा महापौर.
- १९४६ - बर्नार्ड डोवियोगो, नौरूचा राष्ट्राध्यक्ष.
- १९४७ - सलाहुद्दीन, क्रिकेट खेळाडू, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- १९६८ - क्रिस लुईस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९७३ - एच.डी. ऍकरमन, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
[संपादन] मृत्यू
- १४०० - रिचर्ड दुसरा, ईंग्लंडचा राजा.
- १४०५ - तैमुर लंग, मोंगोल राजा.
- १५२३ - पोप एड्रियान सहावा.
- १८३१ - व्हिसेंते ग्वेरेरो, मेक्सिकोचा स्वातंत्र्यसैनिक.
- १८९१ - विल्यम टेकुमेश शेर्मन, अमेरिकन सेनापती.
- १९७५ - पी.जी.वुडहाउस, ब्रिटीश लेखक.
- १९८९ - जेम्स बॉन्ड, अमेरिकन पक्षीशास्त्रज्ञ.
- १९९५ - उ नु, म्यानमारचा राजकारणी.
- २००५ - रफिक हरिरि, लेबेनॉनचा राष्ट्राध्यक्ष.
[संपादन] प्रतिवार्षीक पालन
- व्हॅलेन्टाईन्स डे - पाश्चात्य व पाश्चात्य-प्रभावित देश.
फेब्रुवारी १२ - फेब्रुवारी १३ - फेब्रुवारी १४ - फेब्रुवारी १५ - फेब्रुवारी १६ - (फेब्रुवारी महिना)