सवाई गंधर्व
Wikipedia कडून
हिदुस्थानी पद्धतीचे ख्यातनाम शास्त्रीय गायक सवाई गंधर्व हे गंधर्व परंपरेतील एक होत. त्यांचे नाव रामभाऊ कुंदगोळकर होते.
|
||||
---|---|---|---|---|
उपाख्य | सवाई गंधर्व | |||
जीवनकाल | इ.स. १८८६ (कुंदगोळ, धारवाड, कर्नाटक) ते १२ सप्टेंबर इ.स. १९५२ |
|||
आई-वडिल | ||||
पती-पत्नी | ||||
गुरू | उस्ताद अब्दुल करीम खाँ | |||
गायन प्रकार | हिंदुस्थानी शास्त्रीय गायन | |||
घराणे | किराणा घराणे | |||
कार्य | ||||
गौरव |
रामभाऊंच्या कुटुंबात संगीताची विशेष पार्श्वभूमी नसताना त्यांनी संगीतामध्ये रुची वाढविली आणि हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या अभ्यासाला उस्ताद अब्दुल करीम खान यांच्या मार्गदर्शनाखाली प्रारंभ केला. तेथील अभ्यास पूर्ण केल्यानंतर रामभाऊंनी एका नाटक कंपनीला सामील झाले आणि लवकरच मराठी रंगभूमीवर त्यांनी स्वतःचे स्थान निर्माण केले. बालगंधर्व (उर्फ नारायण राजहंस) यांच्याप्रमाणे त्यांनादेखील लोक सवाई गंधर्व या नावाने ओळखू लागले. त्यांनी गायलेली मराठी नाट्यसंगीतातील काही पदे आज अजरामर झाली आहेत.
[संपादन] ख्यातनाम गुरू आणि मार्गदर्शक
व्यक्तीच्या गुणवत्तेचा खरा कस अनेक ठिकाणी लागतो, त्यातील सर्वाधिक उच्चदर्जाची कसोटी म्हणजे ती व्यक्ती इतरांमध्ये असलेल्या गुणवत्तेला कसे फुलविते आणि त्यांना कसा वाव देते तसेच मार्गदर्शन करते. सवाई गंधर्व या मूल्यांधारित कसोटीवर सर्वाधिक खरे उतरले आहेत. किराणा घराण्याची परंपरा यशस्वीरित्या पुढे नेणाऱ्या आणि अधिकच उजळविणाऱ्या त्यांनी मार्गदर्शन केलेल्या गायक/गायिका तसेच भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्र आज त्यांच्या ऋणी आहेत. यापैकी काही नावे म्हणजे पंडित भीमसेन जोशी, बसवराज राजगुरू, गंगुबाई हंगल, वगैरे. यापैकी पंडित भीमसेन जोशी त्यांच्या गुरूंच्या स्मरणार्थ दरवर्षी सवाई गंधर्व संगीत महोत्सव पुणे येथे भरवितात.