Web Analytics

See also ebooksgratis.com: no banners, no cookies, totally FREE.

CLASSICISTRANIERI HOME PAGE - YOUTUBE CHANNEL
Privacy Policy Cookie Policy Terms and Conditions
पुणे - विकिपीडिया

पुणे

Wikipedia कडून

मुखपृष्ठ सदर लेख हा लेख मार्च १, २००७ रोजी मराठी विकिपीडियावरील मुखपृष्ठ सदर होता.
हा लेख पुणे शहराविषयी आहे. पुणे जिल्ह्याच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या
पुणे
जिल्हा पुणे जिल्हा
राज्य महाराष्ट्र
लोकसंख्या सुमारे ३७ लाख
२००१
दूरध्वनी संकेतांक ०२०
टपाल संकेतांक ४११-xxx
वाहन संकेतांक MH-१२, MH-१४ (पिंपरी चिंचवड)
निर्वाचित प्रमुख सौ.राजलक्ष्मी भोसले
(महापौर)
प्रशासकीय प्रमुख डॉ. नितीन करीर
(महानगरपालिका आयुक्त)
संकेतस्थळ http://www.egovpmc.com

पुणे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. हे शहर महाराष्ट्राच्या पश्चिम भागात, मुळामुठा ह्या दोन नद्यांच्या किनारी वसलेले असून पुणे जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. पुणे हे भारतातील सातवे मोठे शहर व महाराष्ट्रातील दुसरे मोठे शहर आहे. नागरी सोयीसुविधा व विकासाबाबतीत पुणे हे महाराष्ट्रात मुंबईनंतर अग्रेसर आहे. अनेक नामांकित शिक्षणसंस्था या शहरात असल्यामुळे याला पूर्वेचे ऑक्सफोर्ड असे संबोधतात. पुण्यात अनेक माहितीतंत्रज्ञान, ऑटोमोबाईल कंपन्या आहेत. यामुळे पुणे भारताचे 'डेट्रॉईट' होऊ लागले आहे. २००१ च्या जनगणनेनुसार पुण्याची लोकसंख्या सुमारे ३७,००,००० होती. शिवपूर्वकाळापासून ज्ञात इतिहास असलेले पुणे शहर ही महाराष्ट्राची 'सांस्कृतिक राजधानी' मानली जाते. मराठी ही शहरातील मुख्य भाषा आहे.

शहरात असलेल्या नामांकित शिक्षणसंस्थांमुळे पुणे हे विद्येचे माहेरघर मानले जाते. शहरात सर्व विषयातील उच्च शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध आहेत. पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, आयुका, आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूट, सी-डॅक यासारख्या संस्था आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन करत आहेत.

पुणे हे महाराष्ट्रातील व भारतातील एक महत्त्वाचे औद्योगिक केंद्र आहे. टेल्को, बजाज ऑटो, भारत फोर्ज यासारखे उत्पादनक्षेत्रातील अनेक मोठे उद्योग येथे आहेत. १९९० च्या दशकात इन्फोसिस, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, विप्रो, सिमँटेक, आयबीएम सारख्या प्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपन्यांनी पुण्यात आपली केंद्रे उघडल्यापासून पुणे हे भारतातील एक प्रमुख माहितीतंत्रज्ञान उद्योगकेंद्र म्हणून विकसित होत आहे.

अनुक्रमणिका

[संपादन] नाव

पुणे हे नाव 'पुण्यनगरी' या नावावरून आले असल्याचे समजले जाते. इ.स. ८ व्या शतकात ते 'पुन्नक' (किंवा 'पुण्यक') नावाने ओळखले जात असल्याचे संदर्भ सापडतात. इ.स. ११ व्या शतकात ते 'कसबे पुणे' किंवा 'पुनवडी' नावाने ओळखले जाऊ लागले. मराठा साम्राज्याच्या कालखंडात या शहराचे नाव 'पुणे' असे वापरले जात होते. ब्रिटिशांनी त्याला 'पूना' संबोधण्यास सुरुवात केली. आता हे शहर पुणे या अधिकृत नावाने ओळखले जाते.

[संपादन] इतिहास

शनिवारवाडा
शनिवारवाडा

आठव्या शतकात पुणे हे पुन्नक म्हणून ओळखले जात असे. शहराचा सर्वात जुना पुरावा इ.स. ७५८चा आहे ज्यात त्या काळातील राष्ट्रकूट राजवटीचा उल्लेख आढळतो. मध्ययुगीन काळाचा अजून एक पुरावा म्हणजे जंगली महाराज रस्त्यावर असलेली पाताळेश्वर लेणी. ही लेणी आठव्या शतकातील आहेत.

१७ व्या शतकापर्यंत हे शहर निजामशाही, आदिलशाही, मुघल अशा वेगवेगळ्या राजवटींच्या अंमलाखाली होते. सतराव्या शतकामध्ये शहाजीराजे भोसले यांना निजामशाहाने पुण्याची जहागिरी दिली होती. या जहागिरीमध्ये त्यांच्या पत्नी जिजाबाई वास्तव्यास असताना इ.स. १६२७ मध्ये शिवनेरी किल्ल्यावर शिवाजीराजे भोसले यांचा जन्म झाला. शिवाजी महाराजांनी आपल्या साथीदारांसह पुणे परिसरातील मुलखापासून सुरुवात करत मराठ्यांचे स्वराज्य स्थापले. या काळात पुण्यात शिवाजीमहाराजांचे वास्तव्य होते. पुढे पेशव्यांच्या काळात इ.स. १७४९ साली सातारा ही छत्रपतींची गादी असलेली राजधानी राहून पुणे मराठा साम्राज्याची 'प्रशासकीय राजधानी' बनली. पेशव्यांच्या या काळात पुण्याची मोठी भरभराट झाली. इ.स. १८१८ पर्यंत पुण्यावर मराठ्यांचे राज्य होते.

[संपादन] मराठा साम्राज्य

पुणे हे शिवाजीमहाराजांच्या जीवनपटातील व मराठा साम्राज्याच्या इतिहासातील एक महत्वाचा भाग आहे. इ.स. १६३५-३६ च्या सुमारास जेव्हा जिजाबाई व शिवाजीमहाराज पुण्यास वास्तव्यास आले तेव्हापासून पुण्याच्या इतिहासातील एक नवे पर्व जन्माला आले. शिवाजीमहाराज व जिजामाता पुण्यातील लाल महाल येथे राहत असत. पुण्याचे ग्रामदैवत- कसबा गणपतीची स्थापना जिजाबाईंनी केली. १७व्या शतकाच्या प्रारंभास, छत्रपती शाहूंचे पंतप्रधान, बाजीराव पेशवे (थोरले) यांना पुणे येथे आपले वास्तव्य करायचे होते. छत्रपती शाहूमहाराजांनी त्यांना परवानगी दिली व पेशव्यांनी मुठा नदीच्या काठी शनिवारवाडा बांधला. खरडा येथील ऐतिहासिक किल्ल्यात मराठे व निझामांत इ.स. १७९५मध्ये युध्द झाले. इ.स. १८१७ला पुण्याजवळील खडकी येथे ब्रिटिश व मराठ्यांत युध्द झाले. मराठे या युध्दात हरले व ब्रिटिशांनी पुणे ताब्यात घेतले. ब्रिटिशांनी पुण्याचे महत्व ओळखून शहराच्या पूर्वेस व खडकीत कँटोन्मेंट (लष्कर छावणी) स्थापन केली. इ.स. १८५८ मध्ये पुणे महानगरपालिका स्थापन झाली. १९व्या शतकाच्या उत्तरार्धात पुण्यात अनेक नामांकित शिक्षणसंस्था स्थापन झाल्या.

[संपादन] स्वातंत्र्ययुद्ध

भारतीय स्वातंत्र्ययुद्धात पुण्यातील नेत्यांनी व समाजसुधारकांनी महत्वाचे योगदान दिले. लोकमान्य टिळक आणि वि.दा. सावरकर या नेत्यांमुळे पुण्याने राजकीय पटलावर आपले महत्व जवळजवळ सहा दशके राखले. महादेव गोविंद रानडे, रा.ग. भांडारकर, विठ्ठल रामजी शिंदे, गोपाळ कृष्ण गोखले, महात्मा फुले हे समाजसुधारक व राष्ट्रीय ख्यातीचे नेते पुण्याचे आहेत.

[संपादन] भूगोल

पुण्याचे भारतातील स्थान
पुण्याचे भारतातील स्थान

पुण्याचे जगाच्या नकाशावरचे स्थान १८° ३१' २२.४५" उत्तर अक्षांश, ७३° ५२' ३२.६९ पूर्व रेखांश असे आहे.

पुण्याचा मध्यबिंदू (Zero milestone) हा पुणे जी.पी.ओ पोस्ट ऑफिसच्या बाहेर आहे. जी.पी.ओ. पुणे हे सह्याद्री पर्वतरांगाच्या पूर्वेस, समुद्रसपाटीपासून ५६० मी (१,८३७ फूट) उंचीवर आहे. भीमा नदीच्या उपनद्या मुळा व मुठा यांच्या संगमावर शहर वसले आहे. पवनाइंद्रायणी या नद्यादेखील पुणे शहराच्या (उत्तर-पश्चिम दिशेस) विभागात वाहतात. शहराचा सर्वोच्च बिंदू वेताळ टेकडी (समुद्रसपाटी पासून ८०० मी) आहे तर शहराच्या जवळ असलेल्या सिंहगड किल्लाची उंची (१३०० मी) आहे. पुणे शहर हे कोयना भूकंपप्रवण क्षेत्रात येते हे पुण्याच्या १०० कि.मी. दक्षिण दिशेस आहे. पुण्याला मध्यम व लहान भूकंप झालेले आहेत. कात्रज येथे मे १७, २००४ रोजी ३.२ रि. स्केल चा भूकंप झाला.

[संपादन] पेठा

पुणे शहर हे पूर्वीच्या मध्यवस्तीतल्या नदीकाठच्या पेठांपासून वाढत जाऊन, नवीन उपनगरे जोडली जात विस्तारत गेले आहे. या पेठांची नावे बहुतकरून आठवड्यातील वारांनुसार, तसेच ऐतिहासिक व्यक्तींवरून ठेवली गेली आहेत. पुण्यातील पेठांची नामावली अशी:
कसबा पेठ, रविवार पेठ, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, बुधवार पेठ, गुरुवार पेठ, शुक्रवार पेठ, शनिवार पेठ, गंज पेठ (महात्मा फुले पेठ), सदाशिव पेठ, नवी (सदाशिव) पेठ, नारायण पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, रास्ता पेठ, गणेश पेठ.

[संपादन] उपनगरे

पुणे शहर हे पूर्वीच्या मध्यवस्तीतल्या नदीकाठच्या पेठांपासून वाढत जाऊन, नवीन उपनगरे जोडली जात विस्तारत गेले आहे. या उपनगरांची नामावली अशी:
कोथरूड, हडपसर, कात्रज, ओंध, कोरेगाव पार्क, येरवडा, धनकवडी, बिबेवाडी, कँप, कोंढवा, वारजे माळवाडी, खडकी, दापोडी, पाषाण, बाणेर, खराडी

[संपादन] हवामान

सिंहगडचा पुणे दरवाजा
सिंहगडचा पुणे दरवाजा

पुणे शहरात उन्हाळा, (मॉन्सून) पावसाळा व हिवाळा हे ऋतू अनुभवायाला मिळतात. उन्हाळा- मार्च ते मे (तापमान २५°-२९° से.) असतो व एप्रिल हा सर्वात उष्ण महिना आहे. मे महिन्यात पावसाच्या सरी सुरु होतात. या महिन्यात उष्णता असतेच पण काही वेळेस दमटता अनुभवायाला मिळते. पुण्याच्या रात्री बर्‍याच थंड असतात.

जून महिन्यातील अरबी समुद्रातून येणाऱ्या मॉन्सून वार्‍यांनी पावसाळा सुरू होतो. पुण्याचे पर्जन्यमान वार्षिक ७२२ मि.मी. इतके आहे. जुलै महिन्यात सगळ्यात जास्त पाउस पडतो. पर्जन्यमान मध्यम असलेतरी पावसाच्या सरी अनेक वेळा पुणे शहरातील जीवनक्रम थांबवतात. पावसाळ्यात तापमान २०°-२८° से. इतके असते.

मॉन्सूननंतर ऑक्टोबर महिन्यात दिवसाचे तापमान वाढते व रात्री थंड असतात. हिवाळा हा ऋतू नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्यांपर्यंत असतो. हा काळ पुण्याला भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ आहे. या काळात दिवसाचे तापमान २९°से तर रात्रीचे तापमान १०°से च्या खाली असते. डिसेंबरजानेवारी महिन्यात तर तापमान ५-६°से पर्यंत उतरते. पुण्यात सर्वात जास्त तापमान ४३.३°से इतके २० एप्रिल १९८७/७ मे १८८९ रोजी तर (१७८१-१९४० सालातील) सर्वात कमी तापमान १.७°से १७ जानेवारी १९३५ला नोंदविले गेले. नुकतेच जानेवारी १९९१ला पुण्याचे तापमान २.८°से होते.

[संपादन] जैवविविधता

इथे पुणे शहर टपाल कार्यालयापासून २५ कि.मी.त्रिज्येच्या परिसरात साधारणपणे १,००० सपुष्प वनस्पतींच्या प्रजाती, १०४ फुलपाखरांच्या प्रजाती, ३५० पक्षांच्या प्रजाती आणि ६४ सस्तन प्राण्यांच्या प्रजाती आढळतात.

[संपादन] अर्थकारण

इन्फोसिस, हिंजवडी, पुणे
इन्फोसिस, हिंजवडी, पुणे

पुणे हे महत्वाचे औद्योगिक केंद्र आहे. महाराष्ट्र राज्यात मुंबई महानगरा नंतर पुणे सर्वाधिक औद्योगीकीकरण झालेले शहर आहे. जगातील सर्वाधिक दुचाक्या बनावणारा बजाज ऑटो उद्योग पुण्यात आहे. टाटा मोटर्स (भारतातील सर्वाधिक प्रवासी वाहतूक आणि औद्योगीक वाहने बनावणारा उद्योग), कायनेटीक, डाइमलर-क्रायस्लर (मर्सिडिझ-बेंझ), फोर्स मोटर्स (बजाज टेंपो) हे उद्योग पुण्यात स्थित आहेत.

पुण्यातील अभियांत्रिकी उद्योग - भारत फोर्ज (जगातील दुसरी सर्वात मोठी फोर्जिंग कंपनी), कमिन्स इंजिन्स,अल्फा लव्हाल, सँडविक एशिया, थायसन क्रुप (बकाऊ वूल्फ), केएसबी पंप, फिनोलेक्स, ग्रीव्हज् इंडिया, फोर्ब्स मार्शल, थर्मेक्स इत्यादी.

विद्युत व गृहपयोगी वस्तू निर्माते व्हर्लपूल आणि एल.जी. यांचे उत्पादन कारखाने, फ्रिटो-लेज, कोका-कोला यांचे अन्न प्रक्रिया उद्योग पुण्यात स्थित आहेत. अनेक मध्यम व लहान उद्योग पुण्यात आहेत. आंतरराष्ट्रीय हवाईमार्गाने पुणे जोडले गेले आहे त्यामुळे जवळच्या जिल्ह्यातील अनेक उद्योग निर्यात करु लागले आहेत.

पुण्यात माहिती-तंत्रज्ञान उद्योग विस्तारत आहे. हिंजवडीतील राजीव गांधी आय.टी पार्क, मगरपट्टा सायबरसिटी, तळवडे एम.आय.डी.सी. सॉफ्टवेर पार्क, मॅरिसॉफ्ट आय.टी. पार्क (कल्याणीनगर), आय.सी.सी. इत्यादी आय.टी पार्क्स मुळे आय.टी उद्योगाची भरभराट चालू आहे.

महत्वाच्या भारतीय सॉफ्टवेर कंपन्या- इन्फोसिस, टाटा, फ्ल्युएंट, क्सांसा, टी.सी.एस., टेक महिंद्रा, विप्रो, पटनी, सत्यम, आयफ्लेक्स,सायबेज, के.पी.आय.टी. कमिन्स, दिशा, पर्सिस्टंट सिस्टम्स, जियोमेट्रिक सॉफ्टवेयर, नीलसॉफ्ट व कॅनबे पुण्यात आहेत.

महत्वाच्या बहुराष्ट्रीय सॉफ्टवेर कंपन्या- बी.एम.सी. सॉफ्टवेयर, एनव्हिडिया ग्राफिक्स, एच.एस.बी.सी. ग्लोबल टेक्नोलॉजिस, आय.बी.एम., रेड हॅट, सिमेन्स, ई.डी.एस., युजीएस,कॉग्नीझंट, सिमांटेक, सनगार्ड, वर्संट, झेन्सार टेक्नालॉजीस, टी-सिस्टम आणि एसएएस, आयपीड्रम.

पुणे हे कॉल सेंटर किंवा बी.पी.ओ. उद्योगात देखिल अग्रेसर आहे. इंग्लिश बोलाणारा कर्मचारी वर्ग पुण्यात उपलब्ध असल्यामुळे कन्व्हरजिस, डब्ल्यु.एन.एस., इन्फोसिस, विप्रो, इएक्सएल, एमफेसिस या महत्वाच्या आऊटसोर्सींग कंपन्या पुण्यात आहेत.

पुण्यातील महत्वाच्या कंपन्यांची मुख्यालये -

[संपादन] बाजारपेठ

मार्केट यार्ड व महात्मा फुले भाजी मंडई ही ठिकाणे कृषीउत्पादनांकरिता तर रविवार पेठ हा भाग ग्राहकपयोगी उत्पादनांच्या घाऊक व्यापाराकरिता प्रसिद्ध आहे. बुधवार पेठ विद्यूत आणि संगणकीय उपकरणे, शीतकालिन कपडे, बॅगा, पुस्तके इत्यादी उत्पादनांच्या घाऊक आणि किरकोळ व्यापाराकरिता माहित आहे. तुळशीबाग हा बुधवार पेठेतील भाग तसेच डेक्कनवरील हाँगकाँग-लेन महीलांमध्ये लोकप्रिय नित्योपयोगी उत्पादनांच्या किरकोळ व्यापाराकरिता प्रसिद्ध आहे. याच भागातील अप्पा बळवंत चौक येथे शालेय व इतर पुस्तकांची बाजारपेठे आहे. लक्ष्मी रस्ता कपडे आणि सुवर्णालंकारांच्या खरेदी करिता प्रसिद्ध आहे. कँप विभागातील महात्मा गांधी रस्ता व इस्ट स्ट्रीट, पाश्चात्यवळणाच्या उत्पादनांकरीता माहित आहेत. त्या प्रमाणेच जंगली महाराज रस्ता, फर्गसन रस्ता, कर्वे रस्ता या भागात पण किरकोळ व्यापाराचा मोठ्या प्रमाणावर विस्तार होत आहे. पिंपरी चिंचवड येथे पिंपरी कॅंप व मंडई येथे देखिल मोठी बाजारपेठ आहे.

[संपादन] प्रशासन

[संपादन] नागरी प्रशासन

पुणे शहराची व्यवस्था पुणे महानगरपालिका पाहते. महानगरपालिकेचे कार्यक्षेत्र नागरी प्रशासन व पायाभूत सेवा-सुविधा पुरवणे हे असते. प्रशासकीय प्रमुख या नात्याने बहुतांश कार्यकारी अधिकार महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या आय. ए. एस्‌. अधिकारी दर्जाच्या महापालिका आयुक्ताकडे असतात. महानगरपालिका मतदारांनी निवडून दिलेल्या नगरसेवकांनी बनते. नगरसेवकांचे नेतृत्व महापौर या व्यक्तीकडे असते. महापौर हा केवळ नाममात्र पद असून या पदाकडे अधिकार कमी असतात. पुणे हे ४८ महापालिका प्रभागात विभागले गेले असून प्रत्येक विभागाचे कामकाज सहाय्यक आयुक्त पहात असतात. राज्यातील जवळजवळ सर्व राजकीय पक्ष आपले उमेदवार वरील निर्वाचित पदांसाठी उभे करतात.

[संपादन] जिल्हा प्रशासन

अधिक माहितीसाठी पहा पुणे जिल्हा

पुणे शहर महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यात आहे. जिल्ह्याचा प्रमुख जिल्हाधिकारी हा असतो व त्याचे काम सातबारा, जमीनजुमल्याच्या नोंदी ठेवणे, राज्य सरकाराकरिता सारावसुली, करवसुली व निवडणुकीचे व्यवस्थापन करणे हे असते.

[संपादन] महानगर पोलिस यंत्रणा

पुणे पोलिसांचा प्रमुख पोलिस आयुक्त असतो; जो राज्याच्या गृह मंत्रालयाने नियुक्त केलेला एक आय. पी. एस्‌. अधिकारी असतो. पुणे पोलिस व्यवस्था महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत येतात.

[संपादन] वाहतुक व्यवस्था

पुण्यातील रस्त्यावरील एक दृष्य
पुण्यातील रस्त्यावरील एक दृष्य

पुणे शहर भारताच्या इतर महत्वाच्या शहरांशी रस्ता, रेल्वे व हवाईमार्गाने चांगल्या प्रकारे जोडले गेले आहे. पुणे विमानतळावरुन पूर्वी फक्त देशांतर्गत वाहतूक चालत असे पण आता सिंगापूरदुबईला जाणार्‍या उड्डाणांमुळे, विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झाला आहे.

नवा ग्रीनफिल्ड पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प महाराष्ट्र सरकार सुरु करणार असून तो चाकणराजगुरुनगर या गावांच्याच्या मधील चांदूस व शिरोळी जवळ (पुण्यापासून ४० कि.मी) होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाची जबाबदारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे सोपवली गेली आहे.

पुणे उपनगरीय रेल्वेगाडी
पुणे उपनगरीय रेल्वेगाडी

शहरात पुणे व शिवाजीनगर हे दोन महत्वाचे रेल्वे स्थानक आहेत. पुणे स्थानकावर सर्व रेल्वेगाड्या थांबतात. पुणे व लोणावळ्यादरम्यान उपनगरी रेल्वे गाड्या धावतात ज्यामुळे पिंपरी, खडकीचिंचवड ही उपनगरे शहराशी जोडली गेली आहेत. पुण्याच्या उपनगरी गाड्या लोणावळ्यापर्यंत तर मुंबईच्या कर्जत पर्यंत धावतात. रेल्वे प्रशासन लोणावळा व कर्जत/खोपोली शहरे जोडण्याचे योजत आहे त्याजोगे पुणे-मुंबईच्या दरम्यान असलेली सर्व स्थानके एकमेकांना जोडली जातील. कर्जत-पनवेल लोहमार्ग तयार झाला असून त्यामुळे पुणे-मुंबई शहरातील अंतर २९ कि.मी.ने कमी झाले आहे.

पुणे व मुंबई दरम्यानची रस्तावाहतूक मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गामुळे सुधारली आहे. यामुळे दोन्ही शहरांदरम्यान केवळ तीन तासांचे अंतर राहिले आहे. शासकीय व खाजगी बससेवा पुण्याला मुंबई, हैद्राबादबंगळूर या शहरांशी जोडतात. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे (एस.टी) बससेवा पुण्याला महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाशी जोडते.

पुणे शहर हे २०१० पर्यंत महत्वाचे आय.टी केंद्र होण्याच्या मार्गावर आहे. पुण्याचे चाकरमानी वाढत आहेत त्याचबरोबर गाड्या(कार)/दुचाक्यांची संख्या वाढत आहे. २००५ मध्ये पुण्याच्या १४६ चौ.कि.मी क्षेत्रफळात २०,००,०० कार (मोटारगाड्या) व १०,००,००० दुचाक्या होत्या असे एका अभ्यासात नमूद केले आहे. पुण्यातील उपनगरे कल्याणीनगर, विमाननगर, मगरपट्टा, पिंपरी, चिंववड, बाणेर, वाकड, औंध, हिंजेवाडी, बिबवेवाडी, वानवडी, निगडी-प्राधीकरण झपाट्याने वाढत आहेत पण अरुंद रस्ते वाढत्या वाहनांना कमी पडत आहेत. रस्ता रुंदीकरण, उड्डाण्पुल वैगरे प्रकल्प अनेक वर्ष प्रलंबित राहतात. महापालिका प्रशासनाच्या दिरंगाईमुळे योजना अंमलात यायला खूप वेळ लागतो.

सार्वजनिक वाहतुक व्यवस्था पुण्याच्या वाढत्या लोकसंख्येसाठी अपुरी ठरत आहे. पी.एम.टी.पी.सी.एम.टी. या अनुक्रमे पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वाहतुक व्यवस्था पुण्याच्या सार्वजनिक वाहतुकीच्या कणा आहेत. रिक्षा या शहरांतर्गत वाहतुकीचे साधन आहे. वाहतुक-कोंडीमुळे मोटारगाडी व दुचाकीचालक त्रस्त आहेत, तर पार्किंगची अपुरी व्यवस्था आणखी जेरीस आणते.

[संपादन] लोकजीवन

इ.स.२००१च्या जनगननेनुसार पुणे नागरी क्षेत्र(urban agglomeration) ची लोकसंख्या ४,४८५,००० आहे, ज्यात पिंपरी चिंचवड ह्या जुळ्या शहराची लोकसंख्याही समाविष्ट आहे. पुणे शहरात सॉफ्टवेयर व वाहननिर्मिती व्यवसायात झपाट्याने गुंतवणूक होत आहे त्यामुळे नोकरीच्या शोधात परप्रांतीय शहरात दाखल होत आहे व लोकसंख्येत भर पडत आहे. २००३ पासून बांधकाम क्षेत्राला भरभराट आली आहे. पुणे हे भारतातील सातवे सर्वात मोठे शहर आहे परंतु पुण्याची शहरी अर्थव्यवस्थेचा क्रमांक सहावा आहे. पुण्याचा दरडोई उत्पन्नाबाबत (per capita income) पहिला क्रमांक लागतो आणी गरीब -श्रीमंतातील दरी पुण्यात बरीच कमी आहे. पुण्यात राहणाऱ्यांना पुणेकर असे संबोधतात. शहराची मुख्य भाषा मराठी असून इंग्रजी व हिंदी भाषा देखिल बोलल्या जातात.

[संपादन] पुण्याची भगिनी शहरे

ही शहरे पुण्याची भगिनी शहरे आहेत -

[संपादन] संस्कृती

पुण्याला महाराष्ट्राची सांस्कृतीक राजधानी असे संबोधले जाते. पुण्याची मराठी ही मराठी भाषेतील मानक-रुप (standard) मानतात. पुण्यात वर्षभर सांस्कृतीक कार्यक्रमांची रेलचेल असते. पुणेकरांना संगीत, कला, साहित्याची आवड आहे.

[संपादन] गणेशोत्सव

श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती
श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती

इ.स.१८९४ मध्ये लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला. भाद्रपद (ऑगस्ट किंवा सप्टेंबर) महिन्यात येणार्‍या या सणाच्या दहा दिवसांत अवघे पुणे शहर चैतन्यमय असते. देशा-परदेशातून लोक हा उत्सव पाहण्यासाठी पुण्यात येतात. जागोजागी लहान-मोठी गणेश मंडळे मंडप उभारुन देखावे सजवतात. पुण्याचा गणेशोत्सव विशेष प्रसिध्द आहे.या उत्सवादरम्यान महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ पुणे फेस्टिवल नामक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजते ज्यात संगीत, नृत्य, मैफिली, नाटक आणी क्रीडा प्रकार समाविष्ट असतात. दहा दिवस चालणारा हा सण गणेश विसर्जनाने समाप्त होतो. अनंत चतुर्दशीला सकाळी सुरु होणारी विसर्जन मिरवणुक पुढच्या दिवसाच्या पहाटेपर्यंत चालते. मिरवणूकीसाठी पाच गणपती मंडळांचे अग्रक्रम ठरलेले आहेत.

कसबा गणपती-पुण्याचे ग्रामदैवत
कसबा गणपती-पुण्याचे ग्रामदैवत
  1. कसबा गणपती (हे पुण्याचे ग्रामदैवत आहे)
  2. तांबडी जोगेश्वरी
  3. गुरूजी तालीम
  4. तुळशीबाग
  5. केसरी वाडा (हे मंडळ टिळक पंचांगाप्रमाणे गणेशोत्सव साजरा करते.)

पुण्यातील गणेशोत्सव मंडळे प्राणप्रतिष्ठा केलीली मूर्ती विसर्जीत करून उत्सव मूर्ती परत नेतात. विसर्जन मिरवणूकित ढोल, लेझीम अशी अनेक पथके असतात. अनेक शाळाही आपली पथके पाठवतात.

[संपादन] सवाई गंधर्व संगीत महोत्सव

डिसेंबर महिन्यात अभिजात संगीत मैफलीचा कार्यक्रम पुण्यात होतो ज्याला सवाई गंधर्व संगीत महोत्सव असे संबोधले जाते. तीन रात्री चालणार्‍या या उत्सवात सुप्रसिध्द कलावंत हिंदुस्तानीकर्नाटक संगीत प्रकार सादर करतात. संगीतप्रेमींना हा उत्सव म्हणजे एक पर्वणीच असते.

[संपादन] रंगभूमी

पुणे हे मराठी बुध्दीजीवींचे शहर आहे. मराठी रंगभूमी ही मराठी संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. मराठी नाटके मग ती प्रायोगिक असो वा व्यावसायिक, पुण्यातील मराठी रसिक आवडीने पाहतात. टिळक स्मारक मंदिर, बालगंधर्व रंगमंदिर, भरत नाट्य मंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, सुदर्शन रंगमंचपिंपरी चिंचवड नाट्यगृह ही पुण्यातील व आसपासची महत्वाची नाट्यगृहे आहेत. महाराष्ट्र कल्चरल सेंटरचे सुदर्शन रंगमंच हौशी कलावंतांना चांगले व्यासपीठ पुरवते.

[संपादन] चित्रपट

पुण्यात अनेक मल्टिप्लेक्स आहेत ज्यात मराठी, हिंदी व हॉलीवूड चित्रपट दाखविले जातात. पुणे स्थानकाजवळील आयनॉक्स, विद्यापीठ रस्त्यावरील ई-स्क्वेअर, सातारा रस्ता व कोथरूड येथील सीटीप्राईड, कल्याणीनगर येथील गोल्ड ऍडलॅब्स आणि आकुर्डी येथील फेम गणेश विजन हे पुण्यातील मल्टीप्लेक्स आहेत. मराठी चित्रपट प्रामुख्याने प्रभात आणि सीटीप्राईड चित्रपटगृहात प्रदर्शित केले जातात.

[संपादन] धर्म- अध्यात्म

चतु:श्रृंगी मंदीर शहराच्या उत्तर-पश्चिम डोंगर-उतारांवर आहे. मंदीर ९० फुट उंच १२५ फुट रूंदीचे आहे व याचे व्यवस्थापन चतु:श्रृंगी देवस्थान करते. नवरात्रीच्या दिवसांत मंदीरात विशेष गर्दी असते. शहरातील पर्वती देवस्थान प्रसिध्द आहे.

पुण्याजवळील आळंदीदेहू ही देवस्थाने प्रसिध्द आहेत. आळंदीत संत ज्ञानेश्वर यांची समाधी तर देहू येथे संत तुकारामांचे वास्तव्य होते. दरवर्षी वारकरी संप्रदायाचे लोक या संताच्या पालख्या घेऊन पंढरपुरात पायी जातात. आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर पंढरपूरात वारी पोहोचते.

पुण्यात भारतीय ज्यु लोकांची (बेने इस्त्राएल) मोठी वस्ती आहे. ओहेल डेविड हे इस्त्राएल बाहेरचे एशियातील सर्वात मोठे सिनेगॉग (ज्युंचे प्रार्थनास्थळ) आहे. पुणे हे मेहेरबाबा यांचे जन्मस्थान तर रजनीश यांचे वसतीस्थान होते. रजनीश यांच्या आश्रमात देशी-परदेशी पर्यटक भेट देतात. आश्रमात ओशो व झेन बागा व मोठे ध्यानगृह आहे.

[संपादन] खवय्येगिरी

काका हलवाई यांचे गोड पदार्थ, चितळे बंधुंची बाकरवडी, सुजाता व कावरे कोल्डड्रिंक्स यांची मस्तानी, बुधाणींचे बटाटा वेफर्स, लक्ष्मीनारायण चिवडा हे सर्व पदार्थ म्हणजे पुण्याची खासीयत. जंगली महाराज रस्ता, कँप मधील महात्मा गांधी रस्ता व ईस्ट स्ट्रीट, फर्गसन रस्ता ही पुण्यातील खवय्यांची आवडती ठिकाणं आहेत. फर्गसन रस्त्यावरील हॉटेल वैशाली खूप प्रसिध्द आहे. अमृततुल्ये ही चहाची दुकाने शहराच्या संस्कृतीचा भाग आहे. इतर महाराष्ट्रीय शहरांप्रमाणे मिसळ, वडा-पाव हे खाद्यपदार्थ पुण्यात जागोजागी मिळतात.

पुण्यातील डायनिंग हॉल्स ही अजून एक वैशिष्ट्य. स्वस्त असणारे हे हॉल आरामदायक तर असतातच पण 'अमर्यादित खा!' हा भाग विशेष उल्लेखनीय. रस्त्यांवरील गाड्यांवर मिळणारे कच्छी दाबेली, भेळ, पाणीपुरी इत्यादी हे इतर शहरांप्रमाणेच पुण्यातही प्रसिध्द आहे. जुन्या शहरातील कोल्हापुरी जेवण पुणेकरांना आवडतं.

[संपादन] प्रसारमाध्यमे

सकाळ, लोकसत्ता, लोकमत, पुढारी व केसरी ही मराठी वृत्तपत्रे तर इंडियन एक्सप्रेस, टाइम्स ऑफ इंडियामहाराष्ट्र हेराल्ड ही इंग्लिश वृत्तपत्रे लोकप्रिय आहेत. आकाशवाणी, रेडियो मिर्ची व पुणे विद्यापीठाची विद्यावाणी ही रेडियोकेंद्रे पुण्यात ऐकता येतात. झी मराठी, ई टीव्ही मराठी, सह्याद्री दुरदर्शन या मराठी दूरचित्रवाहिन्या विशेष लोकप्रिय आहेत. अनेक हिंदी व इंग्रजी वाहिन्या देखिल उपलब्ध आहेत. अनेक संस्था आंतरजाल (इंटरनेट) सेवा पुरवतात; परंतु बीएसएनएल, टाटा व रिलायन्स या प्रमुख कंपन्या आहेत.

[संपादन] शिक्षण

पुणे विद्यापीठ
पुणे विद्यापीठ

भारताच्या स्वातंत्र्यानंतर पुणे हे शिक्षण व संशोधन क्षेत्रात आपले वर्चस्व गाजवू लागले. पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) या संस्था स्थापन झाल्यामुळे पुण्याला हे शक्य झाले. फर्गसन महाविद्यालय, स.प.महाविद्यालय, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय या संस्थांमुळे पुणे हे इ.स. १९०० पासून नामांकित होतेच.

पुण्याला जवाहरलाल नेहरू यांनी पूर्वेकडचे ऑक्सफर्ड असे संबोधले होते. पुण्यात अनेक नामांकीत शिक्षण संस्था आहेत. पुण्यात शिकायला देशातून व परदेशातूनही विद्यार्थी येत असतात. पुणेकर देखिल उच्च शिक्षण-संशोधनाबद्दल जागृत आहेत.

[संपादन] प्राथमिक व विशेष शिक्षण

पुणे महानगरपालिका अनेक शाळा चालवते. परंतु पालकांचा कल खाजगी शाळेत घालण्यात असतो. पुण्यातील सर्व शाळा या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ किंवा केंद्रीय बोर्ड (आयसीएसई/सीबीएसई) या संस्थांशी संलग्न असतात. पुणे हे जपानी भाषेच्या शिक्षणाचे भारतातील सर्वात मोठे केंद्र आहे. पुणे विद्यापिठाबरोबर अनेक संस्था जपानी भाषेत शिक्षण देतात. जर्मन (मॅक्स म्युलर भवन), फ्रेंच (आलियाँस फ्राँसे द पूना) या भाषादेखील (कंसात दिलेल्या संस्थांमध्ये) शिकविल्या जातात. काही शाळा इयत्ता आठवीपासून रशियन, जर्मनफ्रेंच या भाषा पर्यायी विषय म्हणून शिकवतात.

[संपादन] उच्च शिक्षण

पुण्यातील बव्हंशी महाविद्यालये पुणे विद्यापीठाशी संलग्न असतात. काही महाविद्यालये अभिमत विद्यापीठांशी संलग्न आहेत. पुणे ही विद्यार्थी संख्येनुसार जगातील सर्वात मोठ्या विद्यापीठांपैकी एक आहे.

[संपादन] पुण्यातील महत्त्वाची महाविद्यालये

महाविद्यालये अभियांत्रिकी महाविद्यालये वैद्यकीय महाविद्यालये व्यवस्थापन महाविद्यालये इतर शाळा
फर्गसन महाविद्यालय शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय बी.जे. मेडिकल कॉलेज सिंबायोसिस राष्ट्रीय विमा अकादमी (नॅशनल इंश्युरंस अकॅडमी) नु.म.वि.
बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स लष्कराचे ए.एफ.एम.सी. नारळकर इन्स्टिट्युट आय.एल.एस. विधी महाविद्यालय साधना विद्यालय हडपसर
आबासाहेब गरवारे महाविद्यालय भारती विद्यापीठाचे अभियांत्रिकी महाविद्यालय भारती विद्यापीठाचे वैद्यकीय महाविद्यालय पुणे विद्यापीठाचे पुम्बा डेक्कन कॉलेज (पुरातत्व व भाषाशास्त्र)
नौरोसजी वाडिया महाविद्यालय एम.आय.टी. आय.एम.डी.आर. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ (संस्कृत)
स.प. महाविद्यालय व्ही.आय.टी. भारतीय विद्याभ्यास (आयुर्वेद व सामाजिक शास्त्रे)
नेस वाडिया महाविद्यालय गोखले इन्स्टिट्युट ऑफ पॉलिटीक्स अँड सोशल सायन्सेस
नु.म.वि.

पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालये दरवर्षी १०,००० इंजिनियर्सना पदवी प्रदान करतात.

[संपादन] संशोधन संस्था

पुणे विद्यापीठाव्यतिरीक्त पुण्यात अनेक सुप्रसिध्द व महत्वाच्या संशोधन संस्था आहेत. विद्यापीठाजवळ राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा आहे तर विद्यापीठाच्या आवारात आयुका, नॅशनल सेंटर फॉर रेडियो ऍस्ट्रोफिजीक्स व नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, राष्ट्रीय विमा अकादमी, केंद्रीय जल शक्ती संशोधन स्थानक (Central Water and Power Research Station), भारतीय हवामानशास्त्र संस्था, आघारकर संशोधन संस्था, ऑटोमोटीव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया व राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था या संस्था स्थित आहेत.

[संपादन] लष्कर शिक्षण व संशोधन संस्था

लष्कर शिक्षण देणार्‍या अनेक संस्था पुण्यात आहेत. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए), कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनियरींग, आर्मी इन्स्टिट्युट ऑफ फिजीकल ट्रेनींग तसेच लष्कराचे ए.एफ.एम.सी. वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी भारतीय लष्कराच्या सेवेसाठी रुजु होतात. त्याचबरोबर आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टाब्लीशमेंट, डिफेंस इन्स्टिट्युट ऑफ आर्मामेंट टेक्नॉलोजी, एक्स्प्लोझिव्ह रिसर्च अँड डेव्हलपमेंट लॅबोरेटरी, डिफेंस रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गेनायझेशन व आर्मी इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलोजी या लश्कराशी संबंधित संशोधन करणार्‍या संस्था देखिल पुण्यात आहेत.

[संपादन] खेळ

क्रिकेट हा पुण्यातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. हॉकी, फुटबॉल, टेनिस, कबड्डीखोखो हे खेळ देखिल खेळल जातात. पुण्यात दरवर्षी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन आयोजीत केली जाते. पुण्यातील नेहरु स्टेडियमवर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे मुख्यालय आहे. या स्टेडियम क्रिकेटचे आंतरराष्ट्रीय सामने खेळले जातात. डेक्कन जिमखान्यात अनेक खेळ खेळण्याची सुविधा आहे. बालेवाडी येथील शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये इ.स. १९९४चे राष्ट्रीय खेळ झाले होते व इ.स. २००८ मध्ये कॉमनवेल्थ खेळ होणार आहेत.

मूळ पुण्यातील असलेले प्रसिध्द खेळाडू- हेमंत व हृषीकेश कानेटकर, राधिका तुळपुळे व नितीन कीर्तने (टेनिस) हे आहेत. ऑलिंपिक असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश कलमाडी हे पुण्याचे खासदार आहेत.

[संपादन] पर्यटन स्थळे

पर्वती, शनिवार वाडा, सिंहगड किल्ला, खडकवासला धरण, राजा दिनकर केळकर संग्रहालय, पानशेत धरण, बालगंधर्व रंगमंदिर, लाल महाल, आगाखान पॅलेस

पुणे शहराच्या आसपास व पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळांकरीता पहा- पुणे जिल्हा

[संपादन] संदर्भ

[संपादन] बाह्य दुवे


महाराष्ट्राचे निशाण महाराष्ट्र राज्य
जिल्हे नागपूरचंद्रपूरभंडारागोंदियागडचिरोलीअमरावतीअकोलावाशीमहिंगोलीनांदेडवर्धायवतमाळबुलढाणाठाणेमुंबई उपनगरमुंबई जिल्हारायगडरत्नागिरीसिंधुदुर्गनाशिकअहमदनगरपुणेसातारासांगलीकोल्हापूरनंदुरबारधुळेजळगावऔरंगाबादजालनापरभणीबीडलातूरउस्मानाबादसोलापूर
मुख्य शहरे औरंगाबादकोल्हापूरठाणेनवी मुंबईनाशिकनागपूरपुणेपिंपरी चिंचवडमुंबईसोलापूर

Static Wikipedia (no images)

aa - ab - af - ak - als - am - an - ang - ar - arc - as - ast - av - ay - az - ba - bar - bat_smg - bcl - be - be_x_old - bg - bh - bi - bm - bn - bo - bpy - br - bs - bug - bxr - ca - cbk_zam - cdo - ce - ceb - ch - cho - chr - chy - co - cr - crh - cs - csb - cu - cv - cy - da - de - diq - dsb - dv - dz - ee - el - eml - en - eo - es - et - eu - ext - fa - ff - fi - fiu_vro - fj - fo - fr - frp - fur - fy - ga - gan - gd - gl - glk - gn - got - gu - gv - ha - hak - haw - he - hi - hif - ho - hr - hsb - ht - hu - hy - hz - ia - id - ie - ig - ii - ik - ilo - io - is - it - iu - ja - jbo - jv - ka - kaa - kab - kg - ki - kj - kk - kl - km - kn - ko - kr - ks - ksh - ku - kv - kw - ky - la - lad - lb - lbe - lg - li - lij - lmo - ln - lo - lt - lv - map_bms - mdf - mg - mh - mi - mk - ml - mn - mo - mr - mt - mus - my - myv - mzn - na - nah - nap - nds - nds_nl - ne - new - ng - nl - nn - no - nov - nrm - nv - ny - oc - om - or - os - pa - pag - pam - pap - pdc - pi - pih - pl - pms - ps - pt - qu - quality - rm - rmy - rn - ro - roa_rup - roa_tara - ru - rw - sa - sah - sc - scn - sco - sd - se - sg - sh - si - simple - sk - sl - sm - sn - so - sr - srn - ss - st - stq - su - sv - sw - szl - ta - te - tet - tg - th - ti - tk - tl - tlh - tn - to - tpi - tr - ts - tt - tum - tw - ty - udm - ug - uk - ur - uz - ve - vec - vi - vls - vo - wa - war - wo - wuu - xal - xh - yi - yo - za - zea - zh - zh_classical - zh_min_nan - zh_yue - zu -

Static Wikipedia 2007 (no images)

aa - ab - af - ak - als - am - an - ang - ar - arc - as - ast - av - ay - az - ba - bar - bat_smg - bcl - be - be_x_old - bg - bh - bi - bm - bn - bo - bpy - br - bs - bug - bxr - ca - cbk_zam - cdo - ce - ceb - ch - cho - chr - chy - co - cr - crh - cs - csb - cu - cv - cy - da - de - diq - dsb - dv - dz - ee - el - eml - en - eo - es - et - eu - ext - fa - ff - fi - fiu_vro - fj - fo - fr - frp - fur - fy - ga - gan - gd - gl - glk - gn - got - gu - gv - ha - hak - haw - he - hi - hif - ho - hr - hsb - ht - hu - hy - hz - ia - id - ie - ig - ii - ik - ilo - io - is - it - iu - ja - jbo - jv - ka - kaa - kab - kg - ki - kj - kk - kl - km - kn - ko - kr - ks - ksh - ku - kv - kw - ky - la - lad - lb - lbe - lg - li - lij - lmo - ln - lo - lt - lv - map_bms - mdf - mg - mh - mi - mk - ml - mn - mo - mr - mt - mus - my - myv - mzn - na - nah - nap - nds - nds_nl - ne - new - ng - nl - nn - no - nov - nrm - nv - ny - oc - om - or - os - pa - pag - pam - pap - pdc - pi - pih - pl - pms - ps - pt - qu - quality - rm - rmy - rn - ro - roa_rup - roa_tara - ru - rw - sa - sah - sc - scn - sco - sd - se - sg - sh - si - simple - sk - sl - sm - sn - so - sr - srn - ss - st - stq - su - sv - sw - szl - ta - te - tet - tg - th - ti - tk - tl - tlh - tn - to - tpi - tr - ts - tt - tum - tw - ty - udm - ug - uk - ur - uz - ve - vec - vi - vls - vo - wa - war - wo - wuu - xal - xh - yi - yo - za - zea - zh - zh_classical - zh_min_nan - zh_yue - zu -

Static Wikipedia 2006 (no images)

aa - ab - af - ak - als - am - an - ang - ar - arc - as - ast - av - ay - az - ba - bar - bat_smg - bcl - be - be_x_old - bg - bh - bi - bm - bn - bo - bpy - br - bs - bug - bxr - ca - cbk_zam - cdo - ce - ceb - ch - cho - chr - chy - co - cr - crh - cs - csb - cu - cv - cy - da - de - diq - dsb - dv - dz - ee - el - eml - eo - es - et - eu - ext - fa - ff - fi - fiu_vro - fj - fo - fr - frp - fur - fy - ga - gan - gd - gl - glk - gn - got - gu - gv - ha - hak - haw - he - hi - hif - ho - hr - hsb - ht - hu - hy - hz - ia - id - ie - ig - ii - ik - ilo - io - is - it - iu - ja - jbo - jv - ka - kaa - kab - kg - ki - kj - kk - kl - km - kn - ko - kr - ks - ksh - ku - kv - kw - ky - la - lad - lb - lbe - lg - li - lij - lmo - ln - lo - lt - lv - map_bms - mdf - mg - mh - mi - mk - ml - mn - mo - mr - mt - mus - my - myv - mzn - na - nah - nap - nds - nds_nl - ne - new - ng - nl - nn - no - nov - nrm - nv - ny - oc - om - or - os - pa - pag - pam - pap - pdc - pi - pih - pl - pms - ps - pt - qu - quality - rm - rmy - rn - ro - roa_rup - roa_tara - ru - rw - sa - sah - sc - scn - sco - sd - se - sg - sh - si - simple - sk - sl - sm - sn - so - sr - srn - ss - st - stq - su - sv - sw - szl - ta - te - tet - tg - th - ti - tk - tl - tlh - tn - to - tpi - tr - ts - tt - tum - tw - ty - udm - ug - uk - ur - uz - ve - vec - vi - vls - vo - wa - war - wo - wuu - xal - xh - yi - yo - za - zea - zh - zh_classical - zh_min_nan - zh_yue - zu

Static Wikipedia February 2008 (no images)

aa - ab - af - ak - als - am - an - ang - ar - arc - as - ast - av - ay - az - ba - bar - bat_smg - bcl - be - be_x_old - bg - bh - bi - bm - bn - bo - bpy - br - bs - bug - bxr - ca - cbk_zam - cdo - ce - ceb - ch - cho - chr - chy - co - cr - crh - cs - csb - cu - cv - cy - da - de - diq - dsb - dv - dz - ee - el - eml - en - eo - es - et - eu - ext - fa - ff - fi - fiu_vro - fj - fo - fr - frp - fur - fy - ga - gan - gd - gl - glk - gn - got - gu - gv - ha - hak - haw - he - hi - hif - ho - hr - hsb - ht - hu - hy - hz - ia - id - ie - ig - ii - ik - ilo - io - is - it - iu - ja - jbo - jv - ka - kaa - kab - kg - ki - kj - kk - kl - km - kn - ko - kr - ks - ksh - ku - kv - kw - ky - la - lad - lb - lbe - lg - li - lij - lmo - ln - lo - lt - lv - map_bms - mdf - mg - mh - mi - mk - ml - mn - mo - mr - mt - mus - my - myv - mzn - na - nah - nap - nds - nds_nl - ne - new - ng - nl - nn - no - nov - nrm - nv - ny - oc - om - or - os - pa - pag - pam - pap - pdc - pi - pih - pl - pms - ps - pt - qu - quality - rm - rmy - rn - ro - roa_rup - roa_tara - ru - rw - sa - sah - sc - scn - sco - sd - se - sg - sh - si - simple - sk - sl - sm - sn - so - sr - srn - ss - st - stq - su - sv - sw - szl - ta - te - tet - tg - th - ti - tk - tl - tlh - tn - to - tpi - tr - ts - tt - tum - tw - ty - udm - ug - uk - ur - uz - ve - vec - vi - vls - vo - wa - war - wo - wuu - xal - xh - yi - yo - za - zea - zh - zh_classical - zh_min_nan - zh_yue - zu