Web Analytics

See also ebooksgratis.com: no banners, no cookies, totally FREE.

CLASSICISTRANIERI HOME PAGE - YOUTUBE CHANNEL
Privacy Policy Cookie Policy Terms and Conditions
हैदराबाद मुक्तीसंग्राम - विकिपीडिया

हैदराबाद मुक्तीसंग्राम

Wikipedia कडून

स्वामी रामानंद तीर्थ
स्वामी रामानंद तीर्थ

हैदराबाद राज्य ब्रिटीश राजवटीच्या अस्ताच्या वेळी पर्यंत टिकुन असलेले सर्वात मोठे स्वायत्त संस्थानिक राज्य होते.या राज्याची व्याप्ती सध्याच्या तेलंगाणा,मराठवाडा,उत्तर कर्नाटक,विदर्भाचा काही भाग भारताच्या दक्षीण मध्य भागात पसरलेली होती. इ.स.१७२४ पासुन इ.स.१९४८ पर्यंत निजाम हैदराबाद राज्याचे संस्थानिक होते.स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रदिर्घ हैदराबाद मुक्ति संग्रामाची परिणती १९४८ मध्ये भारत सरकारने निजाम शासना विरुद्ध पोलीस कारवाई करुन हैदराबाद संस्थान स्वतंत्र भारतदेशात सामावुन घेतेले.

अनुक्रमणिका

[संपादन] भारतातील संस्थानिक राज्ये

ब्रिटीशपुर्व काळात भारतात अनेक महाराजे, बादशाह तर असंख्य राजे-राजवाडे,सरदार, अगणित जहागिरदार,जमिनदारहोते.व्यापाराच्या निमीत्ताने आलेल्या युरोपियन व्यापारी कंपन्यांनी अल्पावधीत भारतीय राज्ये हडपण्यास सुरवात केली. ब्रिटीश इस्ट ईंडीया कंपनीने,व्यापारा करिता मोगल तत्कालिन मोगल बादशहा जहांगिर कडुन खास परवाने मिळवुन डच आणि पोर्तुगिजांवर व्यापारात मात केली तर फ्रेंचाना युद्धात पछाडले.

ब्रिटीश इस्ट ईंडीया कंपनीने फायदेशिर व्यपारा मुळे आर्थिक संपन्नता मिळाली मोठी कुशल फौज बाळ्गणे सोपे होत गेले. दिल्लीच्या बादशहांची वेळोवेळी मर्जी मिळत गेली. विवीध राजवटींचे आपापसातले संघर्ष चातुर्याने स्वत:च्या फयद्या साठी वापरुन अनेक छोटी मोठी राज्ये गिळंकृत केली.बऱ्याचशा राजांशी तह करुन जमेल तेथे प्रत्यक्ष नाही जमेल तेथे अप्रत्यक्ष वर्चस्व निर्माणकेले. तरी सुद्धा १९४७ पर्यंत ६०० पेक्षा अधिक छोटी मोठी संस्थानिक राज्ये भारतात होती.या संस्थानिकांना अंतर्गत प्रशासना संदर्भात मर्यादित स्वायत्तता होती मात्र सार्वभौमत्व ब्रिटीशांचे होते.या संस्थानिक राज्यांमध्ये सर्वात मोठे निजामाचे हैदराबाद संस्थान होते.

[संपादन] हैदराबाद राज्य

मुख्यत्वे गोदावरी नदीच्या खोऱ्यात पसरलेले हैदराबाद राज्य प्रशासकिय दृष्ट्या ४विभाग आणि १६ जिल्हयांमध्ये विभागले होते.औरंगाबाद मराठवाडा विभागात औरंगाबाद बीड नांदेड आणि परभणी हे जिल्हे होते.गुलबर्गा विभागात बिदर,गुलबर्गा,उस्मानाबाद,रायचुरजिल्हे गुलशानाबाद किंवा मेदक विभागात अत्राफ इ बलदाह,महेबुबनगर,मेदक,नालगोंडा,निझामाबाद जिल्हा; तर वरंगल विभागात अदिलाबाद,करिमनगर,आणि वरंगल जिल्हा होता .

निजामाने इतर बराचसा भाग ब्रिटीशांना विवीध वेळी विवीध कराराअंतर्गत संपुर्ण किंवा भाडेपट्ट्यावर बहाल केला. प्रशासकिय व्यवस्था मुख्यत्वे सरंजामशाही स्वरुपाची होती.शेतसारा वसुली करिता जहागिरी बहाल केल्या असत.जहागिरदार मुख्यत्वे मुस्लिम व कहि प्रमाणात हिंदु असत, किल्लेदार मात्र प्रामुख्याने मुस्लिम असत. करांचा काही भाग वेगवेगळ्या वेळी मोगल,मराठे,इंग्रज इत्यादिंना तत्कालिन करारांनुसार चौथाइ स्वरुपात निजाम देत असे.प्राप्तिकर नसे.

सुरवातीस फार्सि नंतर उर्दु भाषा प्रशासकिय व शैक्षणिक व्यवहाराच्या भाषा होत्या तर जनता प्रामुख्याने तेलगु,कन्नड व मराठी भाषिक होती.इस १९३० मध्ये निजामाकडे ११,००० कर्मचारी होते.ते मुख्यत्वे मुस्लिम समाजातुन होते.स्थानिक मुस्लिम कर्मचाऱ्यांना मुल्कि व इतर राज्यातुन आलेल्या कर्मचार्यांना गैरमुल्कि म्हणत. स्वतंत्र पोस्ट, चलन,पोलिस,व रेल्वे यंत्रणा होती. लोकसंख्या १,८०,००,००० होती ती मुख्यत्वे हिंदु होती.

[संपादन] हैदराबाद राज्य निजामपुर्व इतिहास

हैदराबाद जवळील गोवळकॊंडा किल्ला
हैदराबाद जवळील गोवळकॊंडा किल्ला
  • प्राग ऐतिहासिक

गोदावरी खोऱ्यातील प्राग ऐतिहासिक काळा बद्दल विश्वासार्ह ऐतिहासिक पुराव्यांची उपलब्धता नाही.काही आर्य-द्रविड संघर्ष ग्राह्य धरणारे इतिहासकार गोदावरी खोऱ्यात प्राग ऐतिहासिक काळात द्रविड असावेत असे समजतात त्य सम्रर्थनार्थ अगस्त्य मुनिंच्या विंद्य डोंगरा स दिलेल्या भेटिचा पौराणिक दाखला देतात.गौतम, व वसिष्ठ मुनींचा हि या भागात संचार झाला असावा.[1] रसभदेव,अगस्ति,लोपामुद्रा,दंडकारण्यातील दंड,भार्गव,

पैठण हे प्रतिष्टाण कुंटाला या नावाने अमरावती कुंडीनापुर नावाने-मोगल काळात अमरावती बेरार नावाने- उल्लेख येतो,नांदेड=नंदिकटा,बीड अहमद्नगर=अस्मका

  • ऐतिहासिक

बदामिचे चालुक्य,कल्याणिचे चालुक्य,मौर्य,सुंगा,सातवाहन,हल(हाला),शक क्षत्रप,सतकर्णी,वाकाटक,नल,विंध्यसेना,प्रवरसेना,राष्ट्रकुट,देवगिरीचे यादव,

  • मध्ययुगीन

दिल्लीचे अल्लुद्दीन खिलजी,मुहम्मद तुघलक,गुलबर्गाआणि बिदर चे बहामनी,१४५५जलालखान(तेलंगाणा),मुहम्मद खिलजी,गोळ्कोंड्याचा इब्राहिम कुतुबशाह,

इ.स.१६०० मध्ये अकबराच्या काळात अहमदनगर मोगलांनी घेतले.जहांगिर व तदनंतर शहाजहानच्या जातीने युद्धात उतरल्या नंतर १६३२ पर्यंत तेलंगाणा पर्यंत मोगलांनी वर्चस्व निर्माण केले.विजापुरच्या आदिलशहाने शहाजहानशी तडजोड करुन अहमद्नगर राज्याचा काही भाग स्वत:कडे मिळवला. याच काळात शहाजीराजे भोसले प्रथम अहमदनगर आणि नंतर विजापुरच्या दरबारी सरदार होते.

१६५३ मध्ये औरंगजेब दक्षीणे चा सुभेदार झाला.औरंगजेबाने सुरवातीचा काळ करप्रणालीचा अमल घडवण्यात घातला.१६५८ मध्ये औरंगजेबाने आग्र्यास जाउन बादशाही मिळवली.औरंगजेबाने वैयक्तिकरित्या प्रयत्न करुन १६८६ मध्ये बिजापुर,१६८७ मध्ये गोळकोंडा मोगलांना मिळवले मराठवाडा आणि बेरार अमरावती तील मराठ्यांची पाठशिवणी तात्पुरती थांबली. १६२० नंतर छत्रपती शिवाजी महराजांनी मराठी राज्याची प्रस्थापना केली.परंतु मराठ्यांचे राज्य औरंगजेबास मिळु शकले नाही.

  • दुष्काळांचे उल्लेख विवीध काळात दिसतात, त्यात्या वेळ्च्या राज्यकर्त्यां करता तो काळ सर्वसाधारणता राजअकिय दृष्ट्या कठिण गेल्याचे दिसुन येते.१३९६ ते १४०७;१४२१ ते १४२२;१४७३ ते १४७४;१६२९ त १६३० .मध्ययुगीन इतिहासाचे दुसरे वैशिष्ट्य दिल्लीच्या काही बादशहाना दक्षीणेस खासकरुन औरंगाबाद अहमदनगर भागात जातीने यावे लागले.परिणामी औरंगाबाद हे हैदराबाद राज्याचा मध्ययुगिन काळातील राजकिय हालचालींचे प्रमुख केंद्र राहिले.

[संपादन] हैदराबाद चे निजाम

हैदराबाद आणि बेरार  अमरावती, १९०३
हैदराबाद आणि बेरार अमरावती, १९०३
  • निजामशाही ची स्थापना

१६८७ च्या दख्खन स्वारीत बादशहा औरंगजेबाच्या सैन्यात चिन खालीच खान नावाचा सरदार गोवळ्कोंडा किल्ल्यास घातलेल्या वेढ्यात जख्मी होउन मेला चिन खालीच खान चा मुलगा नवाब गाझिउद्दीनखान हा औरंगजेबाचा पंतप्रधान सादुल्लाखानचा जावई होता.औरंगजेबाने नवाब गाझिउद्दीनखान चा मुलगा मीर ओमारुद्दीन यास औरंगअजेबाने बालपणीच मनसब दिले, तरुणपणी चिन फ़तेखान असे नामाभिदान केले.वयाच्या २६व्या वर्षी त्याला बिजापुर आणि मावळ चा निझाम बनवले नंतर संपुर्ण द्ख्खन ची जबाबदारी त्यास दिली. औरंगजेबानंतर झालेल्या बाद्शहा फारुखसियर ने त्यास निजाम उल मुल्क तर त्यानंतरच्या बाद्शहाने त्यास असिफ्जाह असे नाव दिले.

पण दिल्लीच्या बादशहानेच त्याला शह देण्या करिता १७२४ मध्ये एक लढाई घडवुन आणली ज्यात मीर ओमारुद्दीन चा विजय झाला आधिच कमकुवत झालेली दिल्लीची बादशाही मीर ओमारुद्दीन ची प्रगती थांबवु शकली नाही.

मीर ओमारुद्दीन / निजाम उल मुल्क/असिफ्जाह ने आधी आपली राजधानी औरंगाबाद येथे ठेवली व लवकरच हैदराबाद येथे हलवली.हे राज्य सात त्याच्या सात पिढ्यांनी १७२४ ते १९४८ या काळात उपभोगले. असिफ्जाह ने इंग्रज आणि फ्रेंच दोंघांशी चांगले संबंध ठेवले व मराठ्यांशी युद्धे करुन स्वत:ची गादी मजबुत केली. २१ मे १७४८ मधील त्याच्या निधनानंतर सत्तेच्या साठमारीत फ्रेंच व ब्रिटीशांनी वेगवेगळ्या वंशजाना पुढे करुन परिस्थिती काही काळ अस्थिर ठेवली.नसिरजंग,मुज्जफरजंग,सालाबाथजंग आणि निझाम अली यांनी १३ वर्षे जम आजमवण्याचा प्रयत्न केला त्यात निझाम अली १७६३ मध्ये निझाम झाला व नंतरची ४० वर्षे राज्य केले.

हैदराबाद संस्थानात २२४ वर्षे राज्य करणारे घराणे समरकंद मध्या आशिया तून आलेले मुळात बगदादचे होते.[2]

[संपादन] निजाम उल मुल्क

* ओमरुद्दीन चिक खिलजी खान असिफजाह १ १७२४ ते १७४८ 
* नसिरजंग मीर अहमद १७४८-१७५० 
* मुहिउद्दीन मुज्जफरजंग हिदायत १७५०-१७५१
* असिफ़ दौला मीर अली सालाबात १७५१-१७६२ 
* अलीखान असिफझाह २ १७६२-१८०२ 
* मीर अकबरअलीखान असिफजाह३ १८०२-१८२९
* नसिरुद्दौला फर्खुंदाह अली असिफजाह४ १८२९-१८५७
* अफजलौद्दौला महबुब अली खान असिफजाह५ १८५७-१८६९
* फताह्जंग महबुब अली खान असिफ जाह ६ १८६९-१९११
* फतजंग नवाब मीर ऊस्मान अली खान असिफजाह७ १९११-१९४८
  • पहील्या निजामानंतर झालेल्या सत्ता साठमारीत इंग्रज उजवे ठरले.विवीध करारा अंतर्गत निजाम ब्रिटीश सत्तेचे पाइक ठरले.निजामास उपलब्ध केलेल्या तथाकथीत संरक्षण व सैन्याच्या अर्थीक मोबदला म्हणुन निजामा कडील काही प्रांत खास करुन बेरार म्हणजे आताचे अमरावती प्रांत इंग्रजानी मिळवले.
  • निजामशाहीत निजामांच्या आशिर्वादाने हिऱ्या मोत्यांचा व्यापार बहरास आला.निजाम २० शतकाच्या पुर्वार्धात जगातील सर्वात मोठे धनिक ठरले.फार्सि व उर्दु भाषेस राजाश्रय मिळाला. सर्वसामान्य जनतेस मात्र ब्रिटीशांखालील जनतेस होते तेवढे पण अधिकार नव्हते.ब्रिटीशांनी केलेले सर्व काळे कायदे मात्र राबवले जात.

[संपादन] हैदराबाद, मोगल, मराठे,टिपु,ब्रिटीश आणि निजाम

आसीफ जाहच्या आधीच्या मोगल मराठा संघर्ष काळात छत्रपती शिवाजी महारजांच्या कारकिर्दीत मराठी फौजांनी , काही स्वार्‍या गोदावरी खोर्‍यात केल्याचे मोगल अधिपत्या खालील प्रदेशात लुटी केल्याचे उल्लेख आढळतात.नेताजी पालकर-इ.स.१६६२,प्रतापराव-इ.स.१६७०बेरार,ऑक्टोबर१६७२ रामगीर जिल्हा करीम नगर,ऑक्टोबर १६७४ शिवाजी महाराज- बेरार.स्वत: छत्रपती शिवाजी महारजांनी १६७७ गोळ्कोंडा भेट करुन कुतुबशहाशी करार केले.

सातार्‍याचे छत्रपती शाहूंचे कार्किर्दीत दिल्ली दरबारी होत असलेल्या गादीच्या संघर्षात यशस्वी बाजु घेतल्याने काही काळ मराठ्वाडा चा काही भागाचे चौथ (शेतसर्‍याचा चौथा हिस्सा) घेण्याचे अधिकार मिळाले पण भावी निजाम असिफ्जहाने कोल्हापुर आणि सातारा संघर्षाचा फाय्दा घेउन काही मराठा सरदार स्वत:कडे वळवले व चौथ देणे बंद केले. तसेच दिल्ली दरबारातील संघर्ष आणि स्वत:चे सैनिकी यश च्‍या बळावर १७२४ पर्य़ंत स्वत:ला स्वतंत्र पणे निझाम या नात्याने प्रस्थापित केले.

छत्रपती शाहूंनी रघुजी भोसलेंना फुटीर मराठा सरदारांच्या मागावर पाठवले.मराठा-निजाम संघर्षात निजामास पालखेडच्या लढाईत इ.स.१७२८ मानहानी सहन करावी लागली.तर १७३३ मध्ये भास्कर व रघुजी भोसलेंच्या ३०,००० मराठा फौजेस नांदेड निझामाबद चे आक्रमण सोडुन माघार घ्यावी लागली.१७३७ मध्ये बाजीरावाने भोपाळ येथे निजामाचा पराभव केला.पण निजामाने दक्षीणेत आपले नियंत्रण व्यवस्थीत प्रस्थापित केले.

असिफ्जहाच्या मृत्यु नंतर निजामाच्या वंशजाम्ध्ये झालेल्या संघर्षात सलाबातजंगची बाजुघेउन मराठ्यांनी पुन्हा चौथाईचे अधिकार मिळवले.पण सलाबातजंग गादीवर टिकु शक्ला नाही.नंतर आलेल्या निझाम अली या निजामास १७६३च्या राक्षस्भुवन्च्या लढाईत मराठ्यांनी पुन्हा नमवले.परंतु १७६६ आणि१७६८ साली ब्रिटीशांशी करार करुन संरक्षणाच्या बदल्यात ब्रिटीशांची मांडिलकी करणे निझाम अली ने पसंद केले.

१७९०च्या टिपुसुल्तान विरुद्ध्च्या लढाईत ब्रिटीश,निजाम व मराठे एक झाले पण लौकरच मराठे या करारातुन बाहेर पदले. यात निजामला टिपुचा मोठा area मिळाला पण तो त्याला ब्रिटीश फौजांचा खर्च म्हणुन ब्रिटीशांना द्यावा लागला.

१८०३ मध्ये शिंदे,होळकर,भोसले या त्रयीने पुन्हा एकदा निजामास आव्हान दिले पण अडगावच्या लढाईत मराठ्‍यांना पराभव झेलावा लागला.१७९९मध्ये टिपु संपला १८१८ मध्ये पेशवाई संपली.पेशवाईच्या अस्ता नंतर निजामशाही पुढे १३० वर्षे टिकली पण ब्रिटीश म्हणतील ती पुर्व दिशा म्हणत.

  • अंतर्गत द्वंद्व

निजामांच्या स्वत: च्या स्थानिक सरदार व जहागिरदारांनी पण बरिच आव्हाने वेळोवेळी निजामा समोर उभी केली पण निजामाचां प्रवास त्यातुनही सुखरुप निभावला.हि आव्हाने सर्वसाधारणता वैयक्तिक आकांक्षेमधुन उभी केली गेली त्यामुळे टिकाव धरुशकली नाहित.यात १८१९ हाटकर उठाव तसेच , निजाम आणि ब्रिटीशांना जी आव्हाने देण्यात आली त्यात १८२९ मध्ये निजामाच्या भावाने केलेल्या कटाचा उल्लेख येतो.१८४७ हे वर्ष हैदेराबाद राज्यात मोठ्या प्रमाणात शिया सुन्नी दंगली नंतर निजामास त्याचे मंत्री बद्लावे लागले .

  • बेरार

१८५१ मध्ये निजामास सैन्यास पैसा देणे जमेना तेव्हा बेरार अम्रावती प्रांत इंग्रजांनी तोडुन घेतला व निजामाचा स्वत:चे सैन्य बाळगण्याचा अधिकार कायमचा संपला.

  • १८५७ मध्ये निजामाने ब्रिटीशांशी संपुर्ण मैत्री ठेवली.रोहिल्यांनी आणि काही जहागिरदारांनी अयशस्वी बंड तत्कालीन क्रांती कारकांच्या च्या नेतृत्वा केले. निजामाच्या विश्वासाची भरपाई ब्रिटिशांनी ५१ लाखाचे निजामाचे कर्ज माफ करुन केली.

[संपादन] निजाम कालीन शासन व्यवस्था

  • सरंजाम

सरदार आणि घराणी मुळ मोगल पद्धतीनुसार होती.हे लोक पुर्वी राजाने परवानगी दिली तेवढी फौज बाळगत राजाच्या आज्ञे वरुन त्यांना युद्धास जावे लागे.सैन्य व युद्धाचे खर्च निघावेत म्हणुन त्यांना वतने (मनसब)/जहागिर बांधुन दिली जात असे.त्या वतनातील शेतसारा गोळा केला जात व ठरवलेलाला भाग राजाला दिला जात असे.त्यांच्या वतनांवर त्यांचा दर्जा अवलबुन असे.दर्जा नुसार चढत्या श्रेणीने खान,खान बहादुर,नवाब,जंग,दौला,मुल्क,उमरा,जाह अशी पदवी त्यंना पदवी मिळे. तर विभागांची जबाददारी मोगल बाद्शहा , वजीर,सुभेदार,निजाम इत्यादींकडे देत.हिंदु सरदारांना राय,राजा,राजा बहादुर,राजा राय इ रायन बहादुर,वंत,महाराजा,महाराजा बहादुर अशा असत. पण ब्रिटीशोत्तर काळात सैन्य बाळ्गण्याचा अधिकार संपल्या नंतर त्यांना फक्त महसुल गोळा करण्याचे अधिकार किंवा तनख्वा ठरवुन देण्यात आल्या.काही निजामपुर्व स्थानिक राजांनी पण आपली संस्थाने निजामास शरण जाउन टिकवुन ठेवली यात गडवाल,वानापुर्ति,जतप्रोले,अमरचंटा ,गुरुगुंटा,गोपालपेट,जवालगिरी,सोलापुर,इत्यादींचा समावेश होता

  • सालारजंग च्या सुधारणा १८५३-१८८३

निजामाच्या तत्कालीन प्रधान मंत्री सालारजंगने ब्रिटीशांचे पाहुन १८५८ पासुन प्रशासनात बदल सुधारणा करणे सुरु केले.१८६७ मध्ये विभाग,जिल्हे आणि तालुका पातळीची चालुकरुन पगारी नौकरदारांची भरती सुरु केली.पोलीस,न्याय,शिक्षण,पालिका,सार्वजनिक बांधकाम विभागांची घडी घातली.भारतभरातुन तत्कालीन सुशिक्षीत मुस्लिम समाजास प्रशासनात सामावुन घेण्याचा प्रयत्न केला.अलिगढच्या सर सय्यद अहमद ना आर्थिक पाठबळ पुरवले. १८७५ मध्ये जमीन महसुल गोळा करण्याची मुंबई विभागा प्रमाणे ब्रिटिश पद्धत सुरु केली.१८६० हैदराबाद सोलापुर रस्ता व १८६८-७८ या काळात ब्रिटीश सहकार्‍याने रेल्वे हैदराबाद राज्यात सुरु झाली.उर्दु आणि इंग्रजी जर्नल्स ची सुरुवात झाली.

  • निजामाची सहिष्णुता [3] १८९८ मध्ये राजकीय सुधारंणांचे गाजर निजामाने दाखवले.cabinet व lagislative council ची स्थापना केली यात मर्यादीत संख्येत निजामाचे शासकिय कर्मचारीच होते.सर्वाधिकार निजामा कडेच होते त्यामुळे ह्या सुधारणा सुशिक्षीतांचे समाधान करु शकल्या नाहीत.

[संपादन] निजाम कालीन समाज,अर्थकारण

[संपादन] भारतीय स्वातंत्र्य लढयाच्या परिपेक्षात हैदराबाद राज्य

१८८५ साली कॉंग्रेस ची स्थापना झाल्या नंतर जनमत कॉंग्रेसला अनुकुल होते.कॉंग्रेसच्या राजकिय जागृतिच्या कामांना पाठींबा देणार्‍यात डॉ.अघोरनाथ चटोपाध्याय,मुल्ला अब्दुल कय्युम,रामचंद्र पिल्लई,मौलिम ए शफिक पत्राचे संपादक मोहिब हुसेन,हाजार दास्तान्चे संपादक सय्यद अखिल यांचा समावेश होता.इंग्रजांच्या चुकिच्या शासकिय आणि अवैध धोरणंचा निषेध केला.

अर्थातच सर सय्य्द अहमदच्या प्रभावा खालील निजाम शासनात उंच हुद्दांवर बसलेल्या हितसंबधीयांनी कॉंग्रेसचा विरोध करण्याचे धोरण अवलंबले.त्यामुळे सर सय्य्द अहमदच्या राजकिय व शैक्षणिक व्यापांना प्रोत्साहन आणि कॉंग्रेसचे पाठीराख्यांचे खच्चीकरण असा निजाम शासनाचे धोरण कायम राहीले.१८९१ मध्ये वृत्तपत्रांवर निर्बंध घातले.निजाम शासनास न जुमानणार्‍या शौकत-उल-इस्लाम सारख्या सुधारणावादी वृत्तपत्रांची मुस्कटदाबी केली गेली.

[संपादन] हैदराबाद राज्यातील सामाजिक आणि राजकिय जागृती

लोकमान्यांनी सुरु केलेल्या सार्वजनिक गणेशोत्स्वाची सुरुवात हैदराबादेत शालिबंडा येथे शिवराम शास्त्रि गोरे यांनी तर चादरघाट येथे विद्यार्थ्यांनी बसवुन केली.लौकरच सार्वजनिक गणेशोत्सव इतर महाराष्ट्रा सोबतच संपुर्ण हैदराबाद रज्यात साजरा हौ लागला.सार्वजनिक गणेशोत्सव ने सामाजिक चेतना निर्माण होण्यास मोठीच मदत झाली.आर्य समाजास डॉ.अघोरनाथ चटोपाध्याय,गुलबर्ग्याचे केशवराव कोरटकर,पंडित श्रिपाद सातवळेकर यांनी पाठींबा दिला व राजकिय,सामाजिक,आणि शैक्षणिक जागृतीचे कार्य मोठ्य धडाडीने हातात घेतले.मुल्ला अब्दुल कय्युम खानांनी हैदराबाद मध्यवर्ती वाचनालयाची स्थापना १८९२ मध्ये केली,दैरत उल मौरिफ ची १८९१ मध्ये संशोधन संस्थेची स्थापना केली व अरेबिक भाषेसंबधात आतरराष्ट्रीय मान्यता मिळवली,कॉंग्रेसला जोरदार फक्त पाठींबाच दिला नाहीतर १९०५च्या स्वदेशी आंदोलनात सहभाग हि घेतला व गणेशोत्स्वाशी प्रोत्साहन दिले.मौलवी मोहमद अकबर अली,मौलवी मोहमद मझ‍अर,इत्यादि लोकांना प्रोत्साहन देउन पुरोगामी विचारांची अंजुमन ए मारीफ नावाची संस्था सुरु केली.मौलवी मोहमद अकबर अली सहिफा नावाचे वृत्तपत्र संपादीत केले.

१८९८ मध्ये पुण्याच्या रॅंड खुन खटल्यातील क्रांतीकारी बाळ्कृष्ण हरी चाफेकरांना ६ महिने पेक्षा अधिक काळ हैदराबाद राज्यातील लोकांनी लपवुन ठेवले.पण निजाम पोलिसांनी त्यांना ब्रिटीशांच्या स्वाधीन केले व बदल्यात ब्रिटीश शाबासकी मिळवली.त्याप्रमाणेच रावअसाहेब उर्फ बाबासाहेब या क्रांतीकार्‍यासही निजाम पोलिसांनी १८९८-९९ मध्ये फाशी दिले गेले.

  • स्वदेशी चळवळ
  • खिलाफत

[संपादन] हैदराबाद राज्यातील साम्यवादी चळवळ

[संपादन] हैदराबाद राज्यातील आर्य समाज चळवळ

१८९२ मध्ये स्वांमी गिरांनंद सरस्वतींनी सुधारणा वादी आर्य समाजाची ओळख हैदराबाद येथिल हिंदु समाजाला करुन दिली व सनातन हिंदु मार्तंडांशी धर्म चर्चा केली.काही आर्य समाजींना हैदराबाद राज्यातुन हद्दपार करण्यात आले.

[संपादन] हैदराबाद राज्यातील दलित चळ्वळ

[संपादन] हैदराबाद स्टेट कॉंग्रेस

[संपादन] हैदराबाद मुक्तीसंग्राम

चित्र:180px-Hyderabad state 1909.jpg। हैदराबाद राज्य १९०९

[संपादन] सशस्त्र चळवळ

[संपादन] ऑपरेशन पोलो - पोलिस कारवाई

[संपादन] स्वातंत्र्य सैनिक

  • डॉ. अघोरनाथ चटोपाध्याय

इ.स.१८७८ मध्ये हैदराबादेत आले.डॉ. अघोरनाथ चटोपाध्याय यांचा हैदराबाद राज्या च्या सामाजिक ,राजकीय व वैचारिक वर्तुळात राबता होता.त्यांचे योगदान अद्वितीय होते.डॉ. अघोरनाथ चटोपाध्याय यांनी हैदराबाद राज्यातील राजकिय नेते,लेखक,समाज सुधारक,विवीध क्षेत्रातील तज्ञ व्यक्‍तिंना एकत्र आणले ,प्रोत्साहन दिले.इ.स.१९०७ निजाम कॉलेज येथुन निवृत्त झाले. त्यांचा देहांत इ.स.१९१५ मध्ये झाला.

  • केशवराव कोरटकर

१८६७ साली परभणीजिल्ह्यातील वसमतयेथे त्यांचा जन्म झाला .त्यांचे शिक्षण उत्तर कर्नाटकातील गुलबर्गा येथे त्यांनी वकिली केली. त्या वेळ्च्या महाराष्ट्रातील सामाजिक व राजकिय नेत्यांचा परिचय होता, महाराष्ट्रातील घडामोडींचा त्यांच्या वर ठसा होता.पुण्यातील वसंत व्याख्यान माला व इतर कार्यक्रमास ते उपस्थित असत.१८९६ साली ते हैदराबादेस आले.डॉ. अघोरनाथ चटोपाध्यायांप्रमाणेच केशवराव कोरटकर यांनी सवत:ला सामाजिक व राजकिय कार्यात झोकुन दिले.

  • भाऊराव भिमाजी पाटील मतसागर

सन १९२३ साली औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील जरुळ या गावी श्री. भाऊराव भिमाजी मतसागर यांचा जन्म झाला. अत्यंत हालाखीच्या कौटुंबिक परिस्थितीमुळे शालेय शिक्षणापासून त्यांना वंचित रहावे लागले. तथापि प्रचंड जिज्ञासा व इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी मराठीभाषेसोबतच इतर विविध (मोडी, तेलुगू, गुजराथी, ऊर्दू, इंग्रजी इ.) भाषादेखील स्वपरिश्रमाने आत्मसात केल्या, त्याचबरोबर पौराणिक ग्रंथांचे विश्लेषण करून इतिहास संशोधन केले. हैद्राबाद मुक्तिसंग्रामात त्यांचे तसेच सर्व कुटुंबाचे योगदान व उचललेले कष्ट विशेष उल्लेखनिय होय. आपल्या जरुळ येथील स्वतःच्या घरावर त्यांनी भारताचा तिरंगा फडकावल्यामुळे निजामी राजवटीत रझाकारांनी त्यांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा अनन्वित छळ केला. त्यानंतरही लाठीहल्ल्यात जखमी होवुन बेशुद्ध होईस्तोवर त्यांनी भारतीय ध्वज उतरविला नाही. औरंगाबाद येथे केलेल्या सत्याग्रहामुळे श्री. माणिकचंद पहाडे यांच्यावर रझाकार फारूकी यांनी अत्याचार केल्यामुळे तेथे पुन्हा कुणीही सत्याग्रह करण्यास धजावत नव्हते. श्री. भाऊराव भिमाजी मतसागर यांनी हे आव्हान स्विकारून तेथील सिटीचौकात सत्याग्रह केला. त्यात त्यांना कारावास भोगावा लागला, तसेच फटक्यांची (टिकटीकीची) सजाही सुनावण्यात आली. परंतु तुरूंगातील सर्व राजकीय कैद्यांनी या सजेविरूद्ध पुकारलेल्या आंदोलनामुळे ही सजा मागे घेण्यात आली. हैद्राबाद मुक्तिसंग्रामातील संघर्षानंतर त्यांनी औरंगाबादेतील सामाजिक व राजकीय कार्यात सहभाग घेतला. श्री. विनायकराव पाटील यांच्या सोबत त्यांनी शिक्षण प्रसार आणि सामाजिक सुधारणांच्या कामी स्वतःला वाहून घेतले. याची दखल घेऊन थोर समाज सुधारक श्री. धोंडो केशव कर्वे यांनी त्यांना पारितोषिकही प्रदान केले होते. भारताचे तत्कालीन राष्ट्रपती श्री. वि. वि. गिरी यांनी त्यांची राष्ट्रपती भवनात भेट घेऊन सामाजिक आणि शेतकऱ्य़ांच्या समस्यांवर चर्चा केली, तसेच तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी त्यांना हैद्राबाद मुक्तिसंग्रामातील भरीव योगदानाबद्दल ताम्रपत्र बहाल केले. कृषीक्षेत्रातही श्री. भाऊराव भिमाजी मतसागर यांनी आपल्या कार्यकुशलतेची चुणूक दाखवून ओसाड शेतजमिनीवर भरघोस उत्पादन घेवून दाखविले. ह्या कामगिरीबद्दल त्यांना तत्कालीन राज्यपाल अली यावर जंग यांनी १९७० साली शेतीनिष्ठ शेतकरी या सन्मानाने पुरस्कृत केले. ह्या कार्यक्रमानंतरच श्रिलंकेच्या तत्कालीन पंतप्रधान श्रीमती सिरीमावो भंडारनायके यांनी राजभवनात त्यांची भेट घेऊन कृषीक्षेत्रातील त्यांच्या कार्याची प्रशंसा केली. त्यांच्या इतर शैक्षणिक आणि सामाजिक कार्याबद्दल माजी पंतप्रधान राजीव गांधी, तसेच पी. व्ही. नरसिंहराव यांनी त्यांना सोनेरी पदके देवुन गौरविले होते. या थोर व्यक्तिमत्वाचे सन १९९५ साली वयाच्या ७२व्या वर्षी आकस्मिक निधन झाले.

  • स्वामी रामानंद तीर्थ
  • गोविंदभाई श्रॉफ
  • अनंत भालेराव
  • विजेंद्र काबरा
  • पी. व्ही. नरसिंहराव
  • शंकरराव चव्हाण
  • मुल्ला अब्दुल कय्युम खान
  • रामचंद्र पिल्लई
  • मोहिब हुसेन-मौलिम ए शफिक पत्राचे संपादक ,
  • सय्यद अखिल- हाजार दास्तान्चे संपादक
  • वामन नाईक
  • गोविंदराव नानल
  • दिगंबरराव बिंदू
  • डॉ.मेळकोटे
  • बी.रामकृष्णा राव
  • विनायकराव केशवराव कोरटकर
  • फुलचंद गांधी
  • के.व्ही.रंगारेड्डी
  • देवीसिंग चव्हाण
  • श्यामराव बोधनकर
  • ताराबाई परांजपे
  • बी सत्यनारायण रेड्डी [4]

[संपादन] वृत्तपत्रे

[संपादन] संदर्भ

  • Marathwada Under the Nizams by P.V. Kate

Publisher: Mittal Publication, New Delhi Date Published: 1987 [5]

  • हैदराबादचा स्वातंत्र्यसंग्राम आणि मराठवाडा : लेखक अनंत भालेराव पहिली आवृत्ती (१७ सप्टेंबर १९८७)- स्वामी रामानंद तीर्थ संशोधन संस्था आणि भारत मुद्रक आणि प्रकाशक,दुसरी आवृत्ती मौज प्रकाशन गृह

[संपादन] बाह्य दुवे

Static Wikipedia (no images)

aa - ab - af - ak - als - am - an - ang - ar - arc - as - ast - av - ay - az - ba - bar - bat_smg - bcl - be - be_x_old - bg - bh - bi - bm - bn - bo - bpy - br - bs - bug - bxr - ca - cbk_zam - cdo - ce - ceb - ch - cho - chr - chy - co - cr - crh - cs - csb - cu - cv - cy - da - de - diq - dsb - dv - dz - ee - el - eml - en - eo - es - et - eu - ext - fa - ff - fi - fiu_vro - fj - fo - fr - frp - fur - fy - ga - gan - gd - gl - glk - gn - got - gu - gv - ha - hak - haw - he - hi - hif - ho - hr - hsb - ht - hu - hy - hz - ia - id - ie - ig - ii - ik - ilo - io - is - it - iu - ja - jbo - jv - ka - kaa - kab - kg - ki - kj - kk - kl - km - kn - ko - kr - ks - ksh - ku - kv - kw - ky - la - lad - lb - lbe - lg - li - lij - lmo - ln - lo - lt - lv - map_bms - mdf - mg - mh - mi - mk - ml - mn - mo - mr - mt - mus - my - myv - mzn - na - nah - nap - nds - nds_nl - ne - new - ng - nl - nn - no - nov - nrm - nv - ny - oc - om - or - os - pa - pag - pam - pap - pdc - pi - pih - pl - pms - ps - pt - qu - quality - rm - rmy - rn - ro - roa_rup - roa_tara - ru - rw - sa - sah - sc - scn - sco - sd - se - sg - sh - si - simple - sk - sl - sm - sn - so - sr - srn - ss - st - stq - su - sv - sw - szl - ta - te - tet - tg - th - ti - tk - tl - tlh - tn - to - tpi - tr - ts - tt - tum - tw - ty - udm - ug - uk - ur - uz - ve - vec - vi - vls - vo - wa - war - wo - wuu - xal - xh - yi - yo - za - zea - zh - zh_classical - zh_min_nan - zh_yue - zu -

Static Wikipedia 2007 (no images)

aa - ab - af - ak - als - am - an - ang - ar - arc - as - ast - av - ay - az - ba - bar - bat_smg - bcl - be - be_x_old - bg - bh - bi - bm - bn - bo - bpy - br - bs - bug - bxr - ca - cbk_zam - cdo - ce - ceb - ch - cho - chr - chy - co - cr - crh - cs - csb - cu - cv - cy - da - de - diq - dsb - dv - dz - ee - el - eml - en - eo - es - et - eu - ext - fa - ff - fi - fiu_vro - fj - fo - fr - frp - fur - fy - ga - gan - gd - gl - glk - gn - got - gu - gv - ha - hak - haw - he - hi - hif - ho - hr - hsb - ht - hu - hy - hz - ia - id - ie - ig - ii - ik - ilo - io - is - it - iu - ja - jbo - jv - ka - kaa - kab - kg - ki - kj - kk - kl - km - kn - ko - kr - ks - ksh - ku - kv - kw - ky - la - lad - lb - lbe - lg - li - lij - lmo - ln - lo - lt - lv - map_bms - mdf - mg - mh - mi - mk - ml - mn - mo - mr - mt - mus - my - myv - mzn - na - nah - nap - nds - nds_nl - ne - new - ng - nl - nn - no - nov - nrm - nv - ny - oc - om - or - os - pa - pag - pam - pap - pdc - pi - pih - pl - pms - ps - pt - qu - quality - rm - rmy - rn - ro - roa_rup - roa_tara - ru - rw - sa - sah - sc - scn - sco - sd - se - sg - sh - si - simple - sk - sl - sm - sn - so - sr - srn - ss - st - stq - su - sv - sw - szl - ta - te - tet - tg - th - ti - tk - tl - tlh - tn - to - tpi - tr - ts - tt - tum - tw - ty - udm - ug - uk - ur - uz - ve - vec - vi - vls - vo - wa - war - wo - wuu - xal - xh - yi - yo - za - zea - zh - zh_classical - zh_min_nan - zh_yue - zu -

Static Wikipedia 2006 (no images)

aa - ab - af - ak - als - am - an - ang - ar - arc - as - ast - av - ay - az - ba - bar - bat_smg - bcl - be - be_x_old - bg - bh - bi - bm - bn - bo - bpy - br - bs - bug - bxr - ca - cbk_zam - cdo - ce - ceb - ch - cho - chr - chy - co - cr - crh - cs - csb - cu - cv - cy - da - de - diq - dsb - dv - dz - ee - el - eml - eo - es - et - eu - ext - fa - ff - fi - fiu_vro - fj - fo - fr - frp - fur - fy - ga - gan - gd - gl - glk - gn - got - gu - gv - ha - hak - haw - he - hi - hif - ho - hr - hsb - ht - hu - hy - hz - ia - id - ie - ig - ii - ik - ilo - io - is - it - iu - ja - jbo - jv - ka - kaa - kab - kg - ki - kj - kk - kl - km - kn - ko - kr - ks - ksh - ku - kv - kw - ky - la - lad - lb - lbe - lg - li - lij - lmo - ln - lo - lt - lv - map_bms - mdf - mg - mh - mi - mk - ml - mn - mo - mr - mt - mus - my - myv - mzn - na - nah - nap - nds - nds_nl - ne - new - ng - nl - nn - no - nov - nrm - nv - ny - oc - om - or - os - pa - pag - pam - pap - pdc - pi - pih - pl - pms - ps - pt - qu - quality - rm - rmy - rn - ro - roa_rup - roa_tara - ru - rw - sa - sah - sc - scn - sco - sd - se - sg - sh - si - simple - sk - sl - sm - sn - so - sr - srn - ss - st - stq - su - sv - sw - szl - ta - te - tet - tg - th - ti - tk - tl - tlh - tn - to - tpi - tr - ts - tt - tum - tw - ty - udm - ug - uk - ur - uz - ve - vec - vi - vls - vo - wa - war - wo - wuu - xal - xh - yi - yo - za - zea - zh - zh_classical - zh_min_nan - zh_yue - zu

Static Wikipedia February 2008 (no images)

aa - ab - af - ak - als - am - an - ang - ar - arc - as - ast - av - ay - az - ba - bar - bat_smg - bcl - be - be_x_old - bg - bh - bi - bm - bn - bo - bpy - br - bs - bug - bxr - ca - cbk_zam - cdo - ce - ceb - ch - cho - chr - chy - co - cr - crh - cs - csb - cu - cv - cy - da - de - diq - dsb - dv - dz - ee - el - eml - en - eo - es - et - eu - ext - fa - ff - fi - fiu_vro - fj - fo - fr - frp - fur - fy - ga - gan - gd - gl - glk - gn - got - gu - gv - ha - hak - haw - he - hi - hif - ho - hr - hsb - ht - hu - hy - hz - ia - id - ie - ig - ii - ik - ilo - io - is - it - iu - ja - jbo - jv - ka - kaa - kab - kg - ki - kj - kk - kl - km - kn - ko - kr - ks - ksh - ku - kv - kw - ky - la - lad - lb - lbe - lg - li - lij - lmo - ln - lo - lt - lv - map_bms - mdf - mg - mh - mi - mk - ml - mn - mo - mr - mt - mus - my - myv - mzn - na - nah - nap - nds - nds_nl - ne - new - ng - nl - nn - no - nov - nrm - nv - ny - oc - om - or - os - pa - pag - pam - pap - pdc - pi - pih - pl - pms - ps - pt - qu - quality - rm - rmy - rn - ro - roa_rup - roa_tara - ru - rw - sa - sah - sc - scn - sco - sd - se - sg - sh - si - simple - sk - sl - sm - sn - so - sr - srn - ss - st - stq - su - sv - sw - szl - ta - te - tet - tg - th - ti - tk - tl - tlh - tn - to - tpi - tr - ts - tt - tum - tw - ty - udm - ug - uk - ur - uz - ve - vec - vi - vls - vo - wa - war - wo - wuu - xal - xh - yi - yo - za - zea - zh - zh_classical - zh_min_nan - zh_yue - zu