ई.स. १९४७
Wikipedia कडून
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
- फेब्रुवारी २१ - एडविन लँडने पोलेरॉईड कॅमेऱ्याचे प्रात्यक्षिक दाखवले.
- फेब्रुवारी २३ - आंतरराष्ट्रीय प्रमाण संस्था(ISO)ची स्थापना.
- फेब्रुवारी २८ - तैवानमध्ये आंदोलकांवर पोलिसांचा गोळीबार. शेकडो व्यक्ति ठार.
- एप्रिल २८ - पाच मदतनीसांसह थॉर हायरडाल पेरूच्या किनाऱ्यावरुन पॉलिनेशियाकडे कॉन-टिकी नावाच्या तराफ्यावर निघाला.
- मे ३ - जपानने नवीन संविधान अंगिकारले.
- जुलै १० - मोहम्मद अली झीणा पाकिस्तानच्या गव्हर्नर-जनरलपदी.
- जुलै १९ - म्यानमारच्या सरकारचा योजित पंतप्रधान ऑँग सान व ६ मंत्र्यांची हत्या.
- जुलै २० - म्यानमारमध्ये ऑँग सानच्या खूना बद्दल भूतपूर्व पंतप्रधान उ सॉ व १९ इतरांना अटक.
- जुलै २० - भारतीय व्हाइसरॉय लुई माउंटबॅटनने जाहीर वक्तव्य दिले की वायव्य सरहद्दी प्रांतातील निवडणुकीत जनतेने पाकिस्तानात विलीन होण्याचा कौल दिला आहे.
- जुलै २६ - अमेरिकन राष्ट्राध्यक्ष हॅरी ट्रुमनने सी.आय.ए., संरक्षणखाते व राष्ट्रीय सुरक्षा समितीची स्थापना केली.
- ऑगस्ट ७ - थॉर हायरडाल व त्याच्या चमूने बाल्सा लाकडाच्या तराफ्यातून १०१ दिवसात पॅसिफिक समुद्र पार केला.
- ऑगस्ट ७ - मुंबई महापालिकेने बेस्ट कंपनी आपल्या अधिकारात घेतली.
- ऑगस्ट १४ - अखंड भारतातून पाकिस्तानची निर्मिर्ती, पाकिस्तान दिन.
- ऑगस्ट १५ - भारताचा स्वातंत्र्य दिन.
- ऑगस्ट १५ - मोहम्मद अली झीणा पाकिस्तानच्या गव्हर्नर-जनरलपदी.
- डिसेंबर २३ - बेल लॅबमध्ये प्रथमत: ट्रांझिस्टरचे प्रदर्शन.
- डिसेंबर ३० - रोमेनियाचा राजा मायकेलने राज्य सोडले.
[संपादन] जन्म
- एप्रिल १८ - जेम्स वूड्स, अमेरिकन अभिनेता.
- मे १७ - जॉन ट्रायकोस, झिम्बाब्वेचा क्रिकेटपटू.
- जून ९ - किरण बेदी, भारतातील सर्वप्रथम स्त्री आय.पी.एस. अधिकारी.
- जून १९ - सलमान रश्दी, ब्रिटीश लेखक.
- जुलै १२ - पूचिया कृष्णमुर्ती, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- जुलै २१ - चेतन चौहान, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- जुलै २४ - झहीर अब्बास, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- ऑगस्ट १५ - राखी गुलझार, भारतीय अभिनेत्री.
- सप्टेंबर २१ - स्टीवन किंग, अमेरिकन लेखक.
- सप्टेंबर २८ - शेख हसीना वाजेद, बांगलादेशची पंतप्रधान.
[संपादन] मृत्यू
- एप्रिल २० - क्रिस्चियन दहावा, डेन्मार्कचा राजा.
- मे १७ - जॉर्ज विल्यम फोर्ब्स, न्यू झीलंडचा पंतप्रधान.
- जुलै १९ - ऑँग सान, म्यानमारचा स्वातंत्र्यसैनिक.
- ऑक्टोबर ४ - मॅक्स प्लँक, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.