एप्रिल २०
Wikipedia कडून
एप्रिल २० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १०९ वा किंवा लीप वर्षात ११० वा दिवस असतो.
मार्च – एप्रिल – मे | ||||||
सोम | मंगळ | बुध | गुरू | शुक्र | शनि | रवि |
३० | १ | २ | ३ | ४ | ५ | १ |
२ | ३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ |
९ | १० | ११ | १२ | १३ | १४ | १५ |
१६ | १७ | १८ | १९ | २० | २१ | २२ |
२३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ | २९ |
ई.स. २००७ ग्रेगरी दिनदर्शिका |
अनुक्रमणिका |
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन] सतरावे शतक
[संपादन] अठरावे शतक
- १७७० - जेम्स कूकच्या तांड्याला सर्वप्रथम ऑस्ट्रेलियाचा किनारा दिसला.
- १७९२ - फ्रांसने ऑस्ट्रियाविरुद्ध युद्ध पुकारले.
[संपादन] एकोणिसावे शतक
- १८३६ - अमेरिकेत विस्कॉन्सिन प्रांताची निर्मिती.
- १८६१ - अमेरिकन गृह युद्ध - उत्तरेच्या सेनापती रॉबर्ट ई. लीने राजीनामा देउन व्हर्जिनीयाचे सेनापतीपद घेतले.
- १८६२ - लुई पास्चर व क्लॉड बर्नार्डने पास्चरायझेशनचा प्रयोग केला.
- १८७६ - बल्गेरियात उठाव.
- १८८४ - पोप लिओ तेराव्याने ह्युमेनम जीनसचे प्रकाशन केले व त्याद्वारे मानवाचे पृथ्वीवरील वास्तव्याचे कारण समजावयाचा प्रयत्न केला.
[संपादन] विसावे शतक
- १९१४ - लडलोची कत्तल - अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यात संपकऱ्यांविरुद्ध सोडलेल्या गुंडांनी १७ स्त्री, पुरुष व मुलांना ठार केले.
- १९४५ - दुसरे महायुद्ध - अमेरिकन सैन्याने जर्मनीचे लीपझीग शहर काबीज केले.
- १९६७ - स्वित्झर्लंडचे विमान कॅनडाच्या टोरोंटो शहराजवळ कोसळले. १२६ ठार.
- १९६८ - साउथ आफ्रिकन एअरवेझचे बोईंग ७०७ जातीचे विमान विंडहोक शहराजवळ कोसळले. १२२ ठार.
- १९६८ - पियरे ट्रुडु कॅनडाच्या पंतप्रधानपदी.
- १९७२ - अंतराळयान अपोलो १६ चंद्रावर उतरले.
- १९७८ - सोवियेत संघाच्या लढाउ विमानांनी कोरियन एअर फ्लाईट ९०२ हे बोईंग ७०७ जातीच्या विमानावर क्षेपणास्त्रे सोडली. २ ठार. वैमानिकांनी कुशलतेने विमान गोठलेल्या तळ्यावर उतरवले.
- १९९८ - एअर फ्रांसचे बोईंग ७२७ जातीचे विमान कोलंबियाच्या बोगोटा विमानतळावरून उडल्यावर डोंगरावर कोसळले. ५३ ठार.
- १९९९ - कॉलोराडोच्या लिटलटन शहरात एरिक हॅरिस व डिलन क्लेबोल्डने आपल्या कोलंबाइन हायस्कूल या शाळेतील १२ विद्यार्थी व १ शिक्षकाला ठार मारले व नंतर आत्मह्त्या केली.
[संपादन] एकविसावे शतक
- २००४ - युटिका, ईलिनॉय शहरात एफ.३ टोर्नेडो. ८ ठार.
- २००४ - ईराकच्या अबु गरीब तुरुंगावर हल्ला. २२ कैदी ठार. ९२ जखमी.
[संपादन] जन्म
- ५७० - मोहम्मद पैगंबर, इस्लाम धर्माचा संस्थापक.
- १६३३ - गो-कोम्यो, जपानी सम्राट.
- १८०८ - नेपोलियन तिसरा, फ्रांसचा सम्राट.
- १८८९ - एडॉल्फ हिटलर जर्मन हुकुमशहा.
- १९३९ - ग्रो हार्लेम ब्रुंड्टलँड नॉर्वेचा पंतप्रधान.
- १९४९ - मासिमो दालेमा इटलीचा पंतप्रधान.
[संपादन] मृत्यू
- १३१४ - पोप क्लेमेंट चौथा.
- १५२१ - झेंगडे, चीनी सम्राट.
- १९४७ - क्रिस्चियन दहावा, डेन्मार्कचा राजा.
- १९५१ - इव्हानो बोनोमी इटलीचा पंतप्रधान.
[संपादन] प्रतिवार्षीक पालन
एप्रिल १८ - एप्रिल १९ - एप्रिल २० - एप्रिल २१ - एप्रिल २२ - (एप्रिल महिना)