जळगाव जिल्हा
Wikipedia कडून
जळगाव जिल्ह्यास पूर्वी पूर्व खानदेश असे संबोधले जात असे. जिल्ह्याच्या उत्तरेस मध्य प्रदेश, पूर्वेस बुलढाणा जिल्हा, दक्षिण-पूर्व दिशेस जालना जिल्हा, दक्षिणेस औरंगाबाद जिल्हा , दक्षिण-पश्चिमेस नाशिक जिल्हा तर पश्चिमेस धुळे जिल्हा आहे. जिल्ह्यात ठिबक सिंचनाद्वारे केळी व कापसाची शेती केली जाते, ही शेती भारतातील इतर शेतक-यांच्या साठी एक आदर्श उदाहरण आहे. जळगाव जिल्हा हा भारतातील सर्वाधिक केळी-उत्पादक जिल्हा आहे.
जिल्ह्याचे क्षेत्रफळ ११,७०० कि.मि² आहे तर लोकसंख्या ३,६७९,९३६ आहे. जिल्ह्याच्या उत्तरेस सातपुडा तर दक्षिणेस अजंता पर्वतरांगा आहेर. जळगाव जिल्ह्यातील ज्वालामुखी (volcanic) मृदा कापूस लागवडीसाठी उपयुक्त आहे. जिल्हा चहा, सोने, कडधान्ये, कापूस व केळी या पदार्थांसाठीचे महत्वाचे व्यापारी केंद्र आहे. मराठी भाषेबरोबरच येथे मराठीची बोलीभाषा असलेली अहिराणी देखिल बोलली जाते. जिल्ह्यात सरासरी ६९० मि.मि इतका पाऊस पडतो. जिल्ह्यातील प्रमुख नद्या- ताप्ती, पूर्णा, गिर्णा, वाघूर
प्रसिध्द कवी बालकवी व कवयित्री बहिणाबाई चौधरी ह्या जळगाव जिल्ह्यातील आहेत तर साने गुरुजी ह्यांची ही कर्मभुमी होय. जळगाव जिल्ह्यात समाविष्टतालुके- चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, जामनेर, पारोळा, एरंडोल, धरणगाव, जळगाव, भुसावळ, मुक्ताईनगर, अमळनेर, चोपडा, यावल, रावेर, बोदवड
जिल्ह्यातील पर्यटनस्थळे: श्री पद्मालय,एरंडोल (अडीच गणेश पीठातील अर्धे पीठ), परोळा किल्ला (झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या वडिलांचा किल्ला), पाल (यवळ तालुका)-थंड हवेचे ठिकाण, फारकंडे मनोरा, पटनादेवी (भास्कराचार्य यांचे जन्मस्थळ व देवस्थान), उनापदेव (चोपडा) गरम पाण्याचे झरे, संत मुक्ताबाई मंदिर, संत चांगदेव मंदिर, मनुदेवी मंदिर, ओंकारेश्वर मंदिर (जळगाव शहर)
[संपादन] संदर्भ
महाराष्ट्र राज्य | |
---|---|
जिल्हे | नागपूर • चंद्रपूर • भंडारा • गोंदिया • गडचिरोली • अमरावती • अकोला • वाशीम • हिंगोली • नांदेड • वर्धा • यवतमाळ • बुलढाणा • ठाणे • मुंबई उपनगर • मुंबई जिल्हा • रायगड • रत्नागिरी • सिंधुदुर्ग • नाशिक • अहमदनगर • पुणे • सातारा • सांगली • कोल्हापूर • नंदुरबार • धुळे • जळगाव • औरंगाबाद • जालना • परभणी • बीड • लातूर • उस्मानाबाद • सोलापूर • |
मुख्य शहरे | • औरंगाबाद • कोल्हापूर • ठाणे • नवी मुंबई • नाशिक • नागपूर • पुणे • पिंपरी चिंचवड • मुंबई • सोलापूर • |