एप्रिल १४
Wikipedia कडून
एप्रिल १४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १०३ वा किंवा लीप वर्षात १०४ वा दिवस असतो.
मार्च – एप्रिल – मे | ||||||
सोम | मंगळ | बुध | गुरू | शुक्र | शनि | रवि |
३० | १ | २ | ३ | ४ | ५ | १ |
२ | ३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ |
९ | १० | ११ | १२ | १३ | १४ | १५ |
१६ | १७ | १८ | १९ | २० | २१ | २२ |
२३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ | २९ |
ई.स. २००७ ग्रेगरी दिनदर्शिका |
अनुक्रमणिका |
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन] इ.स.पू. पहिले शतक
- इ.स.पू. ४३ - फोरम गॅलोरमची लढाई - ज्युलियस सीझरचा मारेकरी डेसिमस ज्युनियस ब्रुटस मार्क ऍन्टनीच्या सैनिकांकडून ठार.
[संपादन] एकोणिसावे शतक
- १८२८ - नोआह वेब्स्टरने डिक्शनरीचा कॉपीराईट नोंदवला.
- १८६० - पोनी एक्स्प्रेसचा पहिला घोडेस्वार साक्रामेंटो, कॅलिफोर्निया येथे पोचला.
- १८६५ - जॉन विल्कस बूथने अब्राहम लिंकनवर गोळी झाडली. लिंकन दुसर्या दिवशी मृत्यू पावला.
[संपादन] विसावे शतक
- १९१२ - आर.एम.एस. टायटॅनिकची हिमनगाशी टक्कर. बोटीला भगदाड पडून बुडु लागली.
- १९१५ - तुर्कस्तानने आर्मेनियावर आक्रमण केले.
- १९३१ - स्पेनच्या सर्वोच्च न्यायालयाने राजा आल्फोन्सो तेराव्याची हकालपट्टी केली व दुसरे स्पॅनिश प्रजासत्ताक अस्तित्त्वात आल्याचे जाहीर केले.
- १९४० - युनायटेड किंग्डमचे सैनिक नॉर्वेतील नाम्सोस गावात शिरले व गाव काबीज केले.
- १९४४ - मुंबईच्या बंदरात उभ्या असलेल्या बोटीवर महाभयानक विस्फोट. ३०० ठार. त्याकाळच्या २ कोटी पाउंडचे नुकसान.
- १९६२ - जॉर्जेस पॉम्पिदु फ्रांसच्या पंतप्रधानपदी.
- १९८६ - अमेरिकेच्या लढाउ विमानांनी लिब्याच्या बेंगाझी व ट्रिपोली शहरांवर हल्ला केला. ६० ठार.
- १९८६ - बांगलादेशमध्ये १ किलो वजनाच्या अतिप्रचंड गारांचा वर्षाव. ९२ ठार. गारांच्या वजनाचा हा विक्रम अजुन अबाधित आहे.
[संपादन] एकविसावे शतक
[संपादन] जन्म
- १३३६ - गो-कोगोन, जपानी सम्राट.
- १५७८ - फिलिप तिसरा, स्पेनचा राजा.
- १७४१ - मोमोझोनो, जपानी सम्राट.
- १८६६ - ऍन सुलिव्हान, हेलन केलरची शिक्षिका.
- १८९१ - बाबासाहेब आंबेडकर, भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार.
- १९२५ - एबेल मुझोरेवा, झिम्बाब्वेचा पंतप्रधान.
[संपादन] मृत्यू
- १५९९ - हेन्री वॅलप, ईंग्लिश राजकारणी.
[संपादन] प्रतिवार्षीक पालन
एप्रिल १२ - एप्रिल १३ - एप्रिल १४ - एप्रिल १५ - एप्रिल १६ - (एप्रिल महिना)